घरदेश-विदेशमंदीची गडद छाया! टेक क्षेत्रानंतर म्युझिक स्ट्रिमींग फर्मकडून नोकर कपातीची घोषणा

मंदीची गडद छाया! टेक क्षेत्रानंतर म्युझिक स्ट्रिमींग फर्मकडून नोकर कपातीची घोषणा

Subscribe

कोरोना काळापासून अनेक बड्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांवर सुरू झालेलं कॉस्ट कटींगचं वादळ यंदाच्या नवीन वर्षातही घोंगावतंय.

Amazon, Coinbase, Salesforce, गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटनंतर आता दिग्गज म्युझिक स्ट्रिमींग फर्ममधून कर्मचारी कपातीची बातमी आहे. अमेरिकेसह संपूर्ण जग २०२३ मध्ये मंदीच्या गर्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षातही जगभरातील विविध क्षेत्रांतील काही प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे.

कोरोना काळापासून अनेक बड्या आयटी कंपन्यांनी नोकर कपात सुरू केली. कर्मचाऱ्यांवर सुरू झालेलं कॉस्ट कटींगचं वादळ यंदाच्या नवीन वर्षातही घोंगावतंय. याचा परिणाम म्हणून हळूहळू टेक कंपन्यामध्ये कॉस्ट कटींगची घोषणा करण्यात येतेय. यापूर्वी गुगलची पॅरेंट कंपनी असलेली अल्फाबेटने त्यांच्या १२ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने परफॉर्मन्स चांगला नसल्याचं कारण देत जवळपास ४५२ फ्रेशर्सना घरचा रस्ता दाखवला. याशिवाय अ‍ॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टने देखील २५,००० हून अधिक कर्मचार्‍यांची कॉस्ट कटींग जाहीर केली आहे. तर स्विगीने ३८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. या यादीत आता दिग्गज म्युझिक स्ट्रिमींग फर्म स्पॉटिफाय कंपनीचा सुद्धा समावेश झाला आहे.

- Advertisement -

स्पॉटिफाय कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने नुकतीच याबाबत घोषणा केलीय. कंपनीला या आठवड्यातच टाळेबंदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. मागील काही दिवसांपासून देशातील आणि जगातील अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांची विविध कारणांनी कपात करत आहेत. आर्थिक मंदीची भीती असल्याकारणाने अनेक कंपन्या आतापासून तयारी करण्याच्या उद्देशाने ही कॉस्ट कटींग करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -