घरताज्या घडामोडीनीट परीक्षेदरम्यान विद्यार्थिंनीना बुरखा काढायला लावला, पालकांची पोलिसांत तक्रार

नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थिंनीना बुरखा काढायला लावला, पालकांची पोलिसांत तक्रार

Subscribe

वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय  पातळीवर नीट-युजी परीक्षा घेतली जाते. रविवारी देशभर ही परीक्षा पार पडली. वाशिम जिल्ह्यात सहा केंद्रांवर ही परीक्षा झाली. 

नीट परीक्षेदरम्यान बुरखा आणि हिजाब उतरायला लावण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यातील एका महाविद्यालयातून समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Muslim girls allege asked to remove burqa and hijab during neet exam)

वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय  पातळीवर नीट परीक्षा घेतली जाते. रविवारी देशभर ही परीक्षा पार पडली. वाशिम जिल्ह्यात सहा केंद्रांवर ही परीक्षा झाली.

- Advertisement -

वाशिम जिल्ह्यातील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालात परीक्षेसाठी गेलेल्या दोन मुस्लिम विद्यार्थींनीना त्यांचा बुरखा काढण्यास सांगितले. याप्रकरणी संतापलेल्या विद्यार्थिंनीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत विद्यार्थिंनीनी म्हटलं आहे की, बुरखा स्वखुशीने नाही काढला तर कापून काढण्यात येईल, अशी धमकी तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. परीक्षा आवारात या दोन विद्यार्थिंनीना येण्याची परवानगी संबंधित महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. उलट कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांशीच हुज्जत घातली.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली असून पोलीस तपास घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -