‘वंदे मातरम’ला ‘या’ मुस्लीम संघटनांचा पाठिंबा; पाकिस्तान समर्थकांवर कारवाईची मागणी

muslim rashtriya manch strict action should be taken against those who raised slogans of pakistan zindabad

सरकारी कार्यालयात कॉलवर ‘हॅलो’ बोलण्याऐवजी वंदे मातरम् बोलण्याचा आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. मात्र या आदेशाला राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला, यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अशात सर्व मुस्लिम संघटनांच्या वतीने मुस्लिम राष्ट्रीय मंचाने समाजकंटक आणि देशद्रोहींविरोधात करण्यासाठी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. यासोबतच फोनवर हॅलो बोलण्याऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.

मंचाने गुरुवारी सकाळी देशभरातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोक, समाज आणि मिल्लत यांना जनजागृतीच्या माध्यमातून समुपदेशन करण्याच्या उद्देशाने बैठक घेतली. त्यात मुस्लिम राष्ट्रीय मंच, हिंदुस्थान फर्स्ट हिंदुस्थानी बेस्ट, भारत फर्स्ट, सुफी शाह मलंग समाज आणि एमआरएम महिला सेल यांसारख्या अनेक संघटनांनी सहभाग घेतला. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

नॅशनल मीडिया प्रभारी शाहिद सईद यांनी सांगितले की, बैठकीत समाजकंटकांचा तीव्र निषेध करण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय संयोजक, सहसंयोजक, राज्य निमंत्रक, प्रादेशिक सहसंयोजक आणि राष्ट्रीय माध्यम प्रभारी उपस्थित होते. देशद्रोही लोकांविरुद्ध कठोर कायदे करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कार्याला सर्वांनी एकजूट दाखवून जोरदार पाठिंबा दिला, ज्यात महाराष्ट्रातील सांस्कृतिक मंत्र्यांनी आदेश काढला आणि फोनवर प्रथम ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचे आवाहन केले.

वंदे मातरम बोलण्यावर शिक्का

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एखाद्या सणासारखा साजरा करत असताना आग्रा आणि बाराबंकी येथे तिरंग्याचा अवमान आणि देशविरोधी कृत्ये लज्जास्पद आहेत. या ठिकाणी पाकिस्तान समर्थकांनी देशाशी गद्दारी करत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्यांमध्ये तरुण आणि मदरशातील मुलांचाही समावेश होता. मंचाचे अध्यक्ष मोहम्मद अफझल आणि संयोजक शाहिद अख्तर म्हणाले की, देश आणि समाजाला तोडणाऱ्या मानसिकतेवर जोरदार प्रहार करण्याची गरज आहे. यासोबतच मंचाने पुढे म्हटले आहे की, या देशात समाजात फूट पाडणे आणि देशद्रोह यांसारख्या विचारांचे समर्थन करणारे मदरसे आजही आहेत याचे अत्यंत दु:ख होत आहे. मात्र या मोजक्या मदरशांचे रोपटेच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात.

या मंचानेमहाराष्ट्र सरकारच्या ‘वंदे मातरम’ अभिवादनाच्या आवाहनाला जोरदार पाठिंबा दिला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रझा अकादमीसारख्या काही मुस्लिम संघटनांचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी ‘वंदे मातरम’ बोलल्यास विरोध केला आहे. या सर्व नेत्यांवर टीका करताना मंचने या मानसिकतेचा उघडपणे विरोध करत वंदे मातरम अभिवादन उपक्रमाचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.


एकनाथ शिंदेंचे ठाण्याला 73 कोटींचे गिफ्ट; उभारली जाणार 11 मजल्यांची भव्य जिल्हा परिषद