उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. भाजपला मत देण्यासाठी एका महिलेच्या कुटुंबियांनी तिला घरातून बाहेर काढले आणि तिला तिहेरी तलाकची धमकी दिल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या महिलेचे नाव उजमा अंसारी असून तिच्या तक्रारीनंतर बारादरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एबीपी न्यूजचे पत्रकार संजय त्रिपाठी यांनी या महिलेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
उत्तर प्रदेश के बरेली में भाजपा को वोट देना मुस्लिम महिला को पड़ा भारी। पति ने घर से निकाला। pic.twitter.com/jJyExrJJV0
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) March 21, 2022
पतीसोबत भांड्याच्या घरात राहत होती
उजमाने पोलिसांना सांगितले की, ‘जानेवारी २०२१ला एजाजनगर गौंटियाच्या तस्लीम अंसारीसोबत तिचा निकाह झाला होता. पतीसोबत ती भांड्याच्या घरात राहत होती. १२ फेब्रुवारीला तिच्या पतीचा मामा घरी आला आणि सपाला मत देण्यास सांगितले.
तलाकसोबत भावाची हत्या करण्याची दिली धमकी
१४ फेब्रुवारीला जेव्हा ती मतदान करून घरी पोहोचली तेव्हा पतीचा मामा आणि दीर आरिफ त्यांच्या घरी पोहोचले. तिला कोणाला मत केले असे विचारले. तिने सांगितले की, तिहेरी तलाक कायदा बनवल्यामुळे आणि गरिबांना राशन दिल्यामुळे भाजप मत दिले. यामुळे नाराज होऊन दोघांनी पतीला बोलावून तिला तलाक देण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ मार्चला तिला घरातून बाहेर काढले. तसेच जर पोलिसांत तक्रार केली तर तलाक देण्यासोबत तिच्या भावाची हत्या केली जाईल, अशीही धमकी देण्यात आली. सध्या पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी; चार पोलीस निलंबित