देशातील हिंदू- मुस्लिम या टोलाच्या राजकारणात एक नवे चित्र समोर येत आहे. देशातील अल्पसंख्याक लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे. मात्र सरकारी बँकांमधील मोठ्या पदांवर मुस्लिमांपेक्षा संख्येने कमी असलेल्या ख्रिश्चन समाजाचे वर्चस्व आहे. सरकारी बँकांमधील अल्पसंख्याक अधिकाऱ्यांच्या 33,527 पदांपैकी 13,771 ख्रिश्चन समाजाचे आहेत.
अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मंत्रालयाला सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते. या अंतर्गत विविध अल्पसंख्याक गटांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून द्यायची होती.
ही माहिती अधिकारी, क्लार्क आणि सब स्टाफ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जातीनुसार स्वतंत्रपणे मागविण्यात आली होती. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय (DoPT) ने म्हटले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याची धर्माच्या आधारे माहिती ठेवली जात नाही. पण वित्तीय सेवा विभागाने बँकांमध्ये काम करणाऱ्या अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची माहिती दिली आहे,
आकडेवारीनुसार, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्याकांमध्ये सर्वाधिक 73.57 टक्के असलेल्या मुस्लिम समाजातील फक्त 8,128 अधिकारी कार्यरत आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शीख अधिकाऱ्यांची संख्या 6972 आहे.
अल्पसंख्याकांचा लोकसंख्येमधील वाटा
मुसलमान 14.2 टक्के
ख्रिश्चन 2.3 टक्के
शीख 1.7 टक्के
बौद्ध 0.7टक्के
जैन 0.4 टक्के
पारसी 0.06 टक्के
अल्पसंख्याक अधिकारी क्लार्क सब स्टाफ
ख्रिश्चन 13771 9189 2096
मुसलमान 8128 5854 3316
शीख 6072 4283 3090
बौद्ध 3515 1460 470
जैन 2011 1170 45
परश्या 04 11 —
झोरास्ट्रियन 26 48 02
या 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आकडेवारी
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया.