घरदेश-विदेशMuthoot समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

Muthoot समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

Subscribe

‘मुथूट ग्रुप’मधील ‘मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे. या मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी (५ मार्च) संध्याकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट ७२ वर्षांचे होते. जॉर्ज मुथूट यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी केरळमध्ये झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एमजी जॉर्ज मुथूट त्याच्या घराच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयातच मृत आणण्यात आले.

एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे सदस्य होते. १९३९ मध्ये केरळात मुथूट कंपनीची स्थापना झाली. एमजी जॉर्ज मुथूट यांनी १९७९ मध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हाती घेतली. तर १९९३ मध्ये त्यांनी मुथूट समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

- Advertisement -

मजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात Muthoot Group मधील Muthoot Fianance Ltd. ने मोठे यश संपादन केले. Muthoot Group ही भारतातील सर्वात मोठी गोल्ड कंपनी बनली असून सध्या या कंपनीचे बाजारमुल्य ५१ हजार कोटी रूपये असून ८ हजार ७२२ कोटी उत्पन्न आहे. जगभरात Muthoot च्या पाचहजारांहून अधिक शाखा आहे. एमजी जॉर्ज मुथूट हे केरळातील ऑर्थोडॉक्स चर्च (Orthodox Church) चे विश्वस्त होते. याशिवाय ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. एवढेच नव्हे तर जॉर्ज मुथूट हे केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

फोर्ब्जच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव

गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते. या यादीत नाव आलेल्या सहा मल्याळी व्यक्तींपैकी जॉर्ज मुथूट एक होते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -