दिल्ली : तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड कितीवेळ बघू शकता? रविवारच्या दिवशीही ऑफिसमध्ये येऊन काम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहिजे, अशी मुक्ताफळे लार्सन अॅण्ड टुब्रोचे ( एलअॅण्डटी ) मुख्य कार्यकारी संचालक एस.एन सुब्रमण्यन यांनी उधळली होती. सुब्रमण्यन यांच्या विधानानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती. या वादात महिंद्रा ग्रपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही उडी घेतली आहे.
माझी पत्नी चांगली आहे; तिच्यासोबत वेळ घालवायला मला आवडते. तसे, खरा प्रश्न किती तास काम करणे हा नाही. तर गुणवत्तापूर्ण निर्मितीचा आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं. नवी दिल्लीतील राष्ट्रीय युवा महोत्सवात आनंद महिंद्रा बोलत होते.
आनंद महिंद्रा म्हणाले, “आपल्याला कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर भर दिला पाहिजे. आपण किती तास काम करतो, याचा विचार करणं आवश्यक नाही. हा प्रश्न 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा नाही. तुम्ही केलेल्या कामानंतर कशा प्रकारचा आऊटपूट मिळतो, ते महत्त्वाचं आहे. फक्त तासांचं चांगलं काम देखील महत्त्वाचा बदल घडवू शकते.”
हेही वाचा : निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी; तरीही अजित पवारांसोबत एकाच कार्यक्रमात दिसल्या सुप्रिया सुळे
“कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवता तेव्हा त्यांचं प्रतिबिंब वैयक्तिक निर्णय निर्णयक्षमतेत आणि सृजनशीलतेत होते. तुम्ही जर फक्त पूर्णवेळ ऑफिसमध्ये असाल, तुमच्या कुटुंबासोबत नसाल, तर लोकांना नेमकं काय खरेदी करायचं आहे, हे तुम्हाला कसं कळेल?” असा सवाल आनंद महिंद्रा यांनी उपस्थित केला आहे.
काम सोडून ‘एक्स’वर ( ट्विटर ) किती वेळ घालवता, असा प्रश्न विचारल्यावर आनंद महिंद्रा यांनी म्हटलं, “मी एकटा आहे म्हणून एक्सवर आहे, असं नाही. माझी पत्नी चांगली आहे. तिच्यासोबत वेळ घालवायला मला आवडते. एक्सवर मी मित्र तयार करण्यासाठी आलो नाही. मी इथे आहे, कारण लोकांना माहिती नाही, हे किती शक्तीशाली व्यावसायिक साधन आहे. मला इथे 11 दशलक्ष लोकांकडून प्रतिसाद मिळतो.”
हेही वाचा : भाजपने रवींद्र चव्हाणांना दिली मोठी जबाबदारी; महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती