घरदेश-विदेशMyanmar : नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना पाच वर्षांचा तुरुंगवास;...

Myanmar : नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना पाच वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी सुनावली शिक्षा

Subscribe

म्यानमारच्या पदच्युत नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. म्यानमारच्या लष्करी न्यायालयात सू की यांच्या विरोधात बंद दरवाजा खटला चालवत आहे.

म्यानमारच्या कायदा अधिकाऱ्याने सांगितले की, 76 वर्षीय सू की यांना 600000 डॉलर कॅश आणि सोने लाच म्हणून घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या असलेल्या सू की यांच्याविरोधात एकूण 11 भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल आहेत. यापैकी अनेक प्रकरणात त्यांना 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये, सू की यांना वॉकी-टॉकी बेकायदेशीरपणे आयात करणे, बाळगणे आणि कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्करी राजवटीच्या दिवशी स्यू की यांच्या निवासस्थानावर सैनिकांनी छापा टाकला, तेव्हा सू की यांच्यावर वॉकी-टॉकी बाळगल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी कथित वॉकीटॉकी उपकरण जप्त करण्यात आले. जंटा सैन्याने सू की यांच्या सरकारची हकालपट्टी केल्यानंतर लगेचच, म्यानमारमध्ये लष्करी राजवटीच्या विरोधात व्यापक निदर्शने झाली, ज्यामुळे लष्कराला रक्तरंजित कारवाई करण्यास प्रवृत्त केले. या हिंसाचारात आतापर्यंत 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. सू की यांच्यावर जवळपास डझनभर खटले आहेत, ज्यात 100 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा आहे. सू यांना लष्करी सरकारने अज्ञातस्थळी ठेवले आहे.

चीन करत आहे लष्करी राज्यकर्त्यांना मदत

1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारच्या सैन्याने निवडून आलेले सरकार उलथवून सत्ता हस्तगत केली. यानंतर लोकशाही समर्थक आंग सान सू की यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तेव्हापासून त्यांना चीनकडून सतत लष्करी आणि इतर प्रकारची मदत मिळत आहे. अलीकडेच चीनने म्यानमारच्या लष्करी राजवटीसाठी मदत वाढवली आहे. या भूमिकेमुळे म्यानमारच्या लष्करी शासकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्याच्या प्रयत्नात चीन हा सर्वात मोठा अडथळा बनला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

सू की या म्यानमारच्या राष्ट्रपितांच्या कन्या

आंग सान सू की या म्यानमार (बर्मा) च्या माजी पंतप्रधान आहेत, एक प्रमुख विरोधी नेत्या आणि म्यानमारच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आहेत. तर बर्मा देशाचे राष्ट्रपती आंग सान यांची मुलगी आहे. 1947 मध्ये आंग सान यांची राजकीय हत्या झाली. बर्मामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सू की यांनी दीर्घ संघर्ष केला. त्यांना 1991 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. लोकशाही समर्थक चळवळीसाठी त्यांनी अनेक दशके तुरुंगात घालवली आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -