(Mystery of the Abandoned Car) भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन दिवसांत प्राप्तिकर विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकले. या छाप्यात मोठ्याप्रमाणावर वसुली करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भोपाळमधील जंगलात एका बेवारस कार सापडली असून त्यात कुबेराचा खजिना सापडला असून हा कुबेर नेमका कोण आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. (Gold and cash worth crores of rupees found in a car in the forest)
भोपाळमधील त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक राजेश शर्मा या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. एका माजी वरिष्ठ नोकरशहाच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या राजेश शर्मा याच्याशी संबंधित लोकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. भोपाळ, ग्वाल्हेर आणि इंदूरमधील 52 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यामध्ये दोन कोटी रुपये रोख, जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, बँक लॉकर्स आणि अनेक कागदपत्रे सापडली. तर, तपास पथकाला आतापर्यंत राजेश शर्माच्या 10 लॉकर्सची माहिती मिळाली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात दागिने सापडले आहेत.
#MadhyaPradesh: Bhopal Police and Income Tax officials seized 52 kg of gold worth ₹42 crore and ₹10 crore in cash from an abandoned car in Mendori’s Ratibad area during a raid.
Efforts are underway to trace the owner of the valuables. pic.twitter.com/40stmjY5BI
— Organiser Weekly (@eOrganiser) December 20, 2024
रातीबड परिसरातील मेंडोराच्या जंगलात एक बेवारस गाडी उभी असल्याची खबर प्राप्तिकर विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार ते दोनच्या सुमारास पोलिसांसह तिथे दाखल झाले. गाडीत दोन बॅगा आढळल्या आणि त्यामध्ये सुमारे 55 किलो सोने आणि 15 कोटी रुपयांची रोकड सापडली. भारतीय बाजारपेठेत सोन्याची किंमत अंदाजे 23,14,00000 रुपये आहे. प्राप्रिकर विभागाने रक्कम आणि सोने ताब्यात घेतले आहे.
एवढी मोठी रोकड आणि सोने असलेला ‘कुबेर’ नेमका कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. ही गाडी ग्वाल्हेर येथील एका व्यक्तीच्या नावावर असून, कारमालकाचा पोलीस शोध घेत आहेत. छाप्यातून ही रक्कम आणि सोने वाचवण्यासाठी ते जंगलात ठेवण्यात आले असावे, असा कयास आहे. (Mystery of the Abandoned Car: Gold and cash worth crores of rupees found in a car in the forest)
हेही वाचा – Munde in Controversy : सर्वपक्षीय निशाण्यावर धनंजय मुंडे, खातेवाटपापूर्वीच मिळणार नारळ?