घरAssembly Battle 2022Manipur CM Oath Ceremony : सलग दुसऱ्यांदा एन बीरेन सिंह यांनी घेतली...

Manipur CM Oath Ceremony : सलग दुसऱ्यांदा एन बीरेन सिंह यांनी घेतली मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Subscribe

सलग दुसऱ्यांदा एन बीरेन सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री बनले आहेत. बीरेन सिंह यांच्यासह नेमचा किपगेन, खेमचंद सिंह, बिस्वजीत सिंह , अवंगबौ न्यूमाई आणि गोविंदास कोंथौजम यांनी देखील इंम्फाळमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

Manipur CM Oath Ceremony :  मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूका भाजपने जिंकल्यानंतर एन बीरेन सिंह यांची पुन्हा एकदा मणिपूरच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. एन बीरेन सिंह यांनी आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यापालांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सलग दुसऱ्यांदा एन बीरेन सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री बनले आहेत. बीरेन सिंह यांच्यासह नेमचा किपगेन, खेमचंद सिंह, बिस्वजीत सिंह , अवंगबौ न्यूमाई आणि गोविंदास कोंथौजम यांनी देखील इंम्फाळमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

- Advertisement -

 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एन बीरेन सिंह म्हणाले, माझे राज्य भ्रष्टाचारमुक्त बनवणे हे माझ्या सरकारने पहिले पाऊल असेल. राज्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करेन. तसेच राज्यातील अमली पदार्थांशी संबंधीत कारवाई करणे, हे दुसरे उद्दिष्ट्य असेल. तर एन बीरेन सिंह पुढे म्हणाले, राज्यात कार्यरत असलेल्या सर्व बंडखोर वाटाघाटींवर संवाद साधला जावा यासाठी मी सतत प्रयत्न करत राहिन. ही तिन्ही उद्दिष्ट्ये साध्य करणे ही माझी प्राथमिक कर्तव्य असतील असे एन बीरेन सिंह म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि किरेन रिजिजू यांनी पक्षाकडून राज्यपालांना एक पत्र पाठवण्यात आले होते. ज्यात एन बीरेन सिंह यांची ३२ आमदारांसह भाजप विधीमंडळात पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. रविवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मणिपूरच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने ६० सदस्यांपैकी ३२ जागा जिंकून पुन्हा एकदा मणिपूरमध्ये सत्ता मिळवली. तर २०१७मध्ये निवडणूकांमध्ये भाजपने केवळ २१ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर इतर पक्षांसोबत युती करुन मणिपूरमध्ये भाजपने सत्ता स्थापन केले होते. २०१७ मध्ये एन बीरेन सिंह यांनी पहिल्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

एन बीरेन सिंह यांनी एक फुटबॉल खेळाडू म्हणून आपली कारकिर्द सुरू केली होती. त्याचप्रमाणे सुरक्षा दलातही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले. अनेक स्थानिक भाषीय वृत्तपत्रात त्यांनी काम केले. नहारोल्गी थोउदांग वृत्तपत्राचे ते संपादक होते. पत्रकारिता करता करता त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दोन दशके ते राजकारणात सक्रिय आहेत. २००२मध्ये डेमोक्रेटिक रेवोल्यूशनरी पीपुल्स पार्टीतून त्यांना विधानसभा सदस्याचे तिकीट मिळाले होते.


हेही वाचा – बापरे! अफगाणिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांवर चक्क टॅक्सी चालवण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -