घरदेश-विदेशएन. कोटिश्वर आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

एन. कोटिश्वर आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांची जम्मू- काश्मीर आणि लडाख हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ही शिफारस केली असून केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी केली जाईल. या समितीने जम्मू काश्मीरचे माजी सरन्यायधीश पंकज मित्तल यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

जम्मू काश्मीर आणि लडाखचे सरन्यायाधीश अली मोहम्मद माग्रे 8 डिसेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ताशी राबस्तान यांनी हंगामी मुख्य न्यायाधीश पदाची जबाबदारी देण्यात आली. आता राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी करून लवकरचं सरन्यायाधीशांची नियुक्त केली जाणार आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती एन. कोटीश्वर नेमके कोण आहेत?

न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांचा जन्म 1 मार्च 1963 मध्ये झाला असून त्यांनी आपले शालेय शिक्षण बंगालमधील पुरुलिया येथील रामकृष्ण मिशन विद्यापाठीतून पूर्ण केले. यानंतर त्यांनी सेंट अँटी कॉलेज शिलाँगमधून प्री – युनिव्हर्सिटी कोर्स केला. राज्यशास्त्रात बीए ऑनर्स पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले. 1986 मध्ये ते वकील झाले आणि लंडन विद्यापीठातून 1992 मध्ये त्यांनी कॉमनवेल्थ यंग लॉयर्स कोर्स केला. सुप्रीम कोर्टात काही वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर ते गुवाहाटी हायकोर्टात गेले.

गुवाहाटी हायकोर्टात जाण्यापूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टात काही काळ सराव केला. 2008 मध्ये गुवाहाटी हायकोर्टाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले. 2011 मध्ये त्यांची गुवाहाटी हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी नियुक्त झाली आणि त्यानंतर 2012 मध्ये ते स्थायी न्यायाधीश झाले. 2013 मध्ये त्यांची मणिपूर हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान 2018 मध्ये त्यांची गुवाहाटी हायकोर्टात बदली झाली. गुवाहाटी हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा यांच्या निवृत्तीनंतर 2020 मध्ये कोटिश्वर सिंह यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


राज्‍यातील गड-किल्‍ले, मंदिरे आणि स्‍मारक होणार पुनर्जीवित; सरकारकडून इतका निधी मंजूर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -