घरCORONA UPDATECovid-19 : 'या' पद्धतीने तुम्ही N-95मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरु शकता

Covid-19 : ‘या’ पद्धतीने तुम्ही N-95मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरु शकता

Subscribe

देशाभरात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी मास्क आणि पीपीई किटची मागणी अद्याप घटली नाही. विशेषत: रुग्णालयांमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे. परंतु हे मास्क किंवा पीपीई किट एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरणे शक्य नसल्याने फेकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु मुंबईतील एका स्टार्टअप कंपनीने असे एक तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्यामाध्यमातून तुम्ही वापरलेले मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरता येणार आहेत. सध्या हे तंत्रज्ञान महाराष्ट्रासह तेलंगणातील अनेक रुग्णालयांमध्ये वापरले जात आहे. एकच मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरण्यासाठीच्या विकसित तंत्रज्ञानामुळे पर्यावरणातील जैविक कचरा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे पर्यावरण निरोगी ठेवता येईल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT)च्या जैवविज्ञान आणि जैव अभियंत्रिकी विभागाने परीक्षण केल्यानंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यात व्हायरस आणि बॅक्टेरियांना निष्क्रिय करण्यात ५ एलओजी(९९.९९९) जास्त असल्याचे आढळून आले. या तंत्रज्ञानाला आता सीएसआयआर (CSIR) आणि एनईईआरआय(NEERI)ने मंजूरी दिली आहे तर आयपी 55 ने प्रामाणित केले आहे.

- Advertisement -

इंद्रा वॉटर स्टार्टअपद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. या स्टार्टअपला एसआयएनई- आयआयटी मुंबईच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून अनुदान मिळाले होते. एसआयएनई-आयआयटी बॉम्बेच्या मदतीने, स्टार्टअपने दरमहा २५ निर्जंतुकीकरण प्रणाली तयार करत त्याचा पुरवठआ केला आहे.

वज्र कवच तंत्रज्ञान विकसित 

या तंत्रज्ञानात एका मल्टीस्टेज विसंक्रमण प्रणालीचा उपय़ोग केला जात आहे. ज्यामुळे पीपीई किटमधील कोरोनाचे विषाणू, जीवाणू, जंतूंना यु-वी प्रकश स्पेक्ट्रमच्या माध्यमातून ९९.९९ टक्के प्रभावशाली करत निष्क्रिय केले जातात. या वज्र कवच नावाच्या तंत्रज्ञानातून मास्क, पीपीई किट वि संक्रमण करत पुन्हा वापरले जाऊ शकतात. यामुळे देशात कोरोनाविषाणूविरोधात लढण्याबरोबरचं जैव कचरा कमी होण्यास मदत होत आहे. हे तंत्रज्ञान वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांप्रमाणेच अत्य़ंत वाजवी किंमतींत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिले जात आहे.

- Advertisement -

गुणवत्तापूर्ण आरोग्यासाठी पीआरआयची होतेयं मदत

पीआरआयने गुणवत्तापूर्ण आरोग्यासाठी विविध प्रकारची उपकरणे ‘कोविड सपोर्ट’ अंतर्गत दिली आहेत. याव्यतिरिक्त रूग्णालयांना १०० व्हेंटिलेटर, १०५ हायफ्लो नोजल कॅन्युल्स (एचएफएनसी), ३५ मल्टीपॅरा मॉनिटर उपलब्ध करुन दिले आहेत. या व्यतिरिक्त आरोग्य सेवा कर्मचारी आणि लोकांच्या वैयक्तिक वापरासाठी मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटप केले. या वस्तू केवळ १७ राज्यांमधील फ्रंटलाइन वॉरियर्ससाठी दिल्या गेल्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -