घरदेश-विदेश...तर कायदा मोडण्याचे अधिकार आम्हाला, केंद्रीय मंत्री गडकरींचे वक्तव्य

…तर कायदा मोडण्याचे अधिकार आम्हाला, केंद्रीय मंत्री गडकरींचे वक्तव्य

Subscribe

मंगळवारी नितीन गडकरी यांनी सरकारी आधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची पद्धत आपल्या भाषेत सांगितली आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या स्टाईल आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. कसलीही पर्वा न करता ते व्यासपाठीवरून आपली मत मांडत असतात. यात मंगळवारीही नितीन गडकरी यांनी सरकारी आधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची पद्धत आपल्या भाषेत सांगितली आहे. मंत्री असल्याने गरीबाच्या कल्याणात आड येणारा कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी गडचिरोली आणि मेळघाटातील रस्ते निर्माण करताना वनविभागाने त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच माझ्या मार्गाने हा प्रश्न सोडवल्याचाही उल्लेख त्यांनी केला. ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेकडून मल्टी डिस्प्लेनरी मल्टी मॉडेल रिझल्टच्या अंतर्गत आदिवासींच्या आरोग्याबाबत ‘ब्लॉसम’ नावाच्या प्रकल्पाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात मी 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मुंबईत अनेक रस्ते, पुल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटात रस्ता बांधणीच्या कामात अनेक अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे 2000 मुलांचा मृत्यू झाला. येथील 450 गावांत रस्तेच नव्हते. त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितले तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ते बांधू दिले नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला.

- Advertisement -

या भागातील अनेक लोक मागसलेली होती. त्यामुळे वनविभागाच्या त्रासानंतही मी माझ्या मार्गाने प्रश्न सोडवला. गरीबांच्या कल्याणात कुठलाही कायदा आड येत नाही, गरीबांच्या कल्याणात आड येणारा कायदा एकदा नाही तर दहावेळा तोडवा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधी यांनी सांगितले, त्यामुळे तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत, असही नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की, तुम्ही म्हणाल तसं सरकार चालणार नाही, तुम्ही फक्त येस सर म्हणायचं आणि आम्ही सांगतो त्याची अंमलबजवाणी करायची हे लक्षात ठेवा. आम्ही म्हणू तसे सरकार चालते. त्यामुळे मी सर्व कायद्यांची पायमल्ली करत 450 गावं एकमेकांना जोडली. मेळघाटला कधी गेलात तर दिसेल, स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने तेथील लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास झाला, असही गडकरींनी नमूद केले.


एक नेता, एक संघटना , एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही; सरसंघचालकांचे प्रतिपादन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -