घरताज्या घडामोडीनेपाळ भारतीय सीमेवर ८९ नवे बीओपी चौकी उभारणार

नेपाळ भारतीय सीमेवर ८९ नवे बीओपी चौकी उभारणार

Subscribe

लिपुलेख-गर्बाधार मार्गाने भारत चीनच्या सीमेवर पोहोचताच नेपाळने आपला खरा चेहरा दाखवला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा नेपाळने आपल्या नकाशामध्ये तीन भारतीय भूभागांचा समावेश केला आणि आता भारता जवळील सीमेवर ८९ नवीन बॉर्डर आउटपोस्ट उभारत आहे. येथे सुमारे दहा हजार सशस्त्र सैन्य दल तैनात करण्याची योजना आहे.

या बीओपी म्हणजेच बॉर्डर आउटपोस्टमध्ये उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांताच्या जवळील सीमा कंचनपूर जिल्ह्यांमध्ये आठ, डडेलधुरामध्ये तीन, कैलालीमध्ये एक आणि बैतडीमध्ये एक बीओपी उभारत आहे. नेपाळने बदलेल्या परिस्थितीत आता मिशन तराई नंतर पश्चिमांचल अभियानाला सुरुवात केली आहे. विकासापासून खंडित झालेल्या दुर्गम सीमा भागांना जोडण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. याशिवाय नेपाळ येथे सैन्य देखील वाढवणार आहे. बीओपीसोबत सशस्त्र सैन्य दलाची संख्या देखील वाढवली जाणार आहे. त्याअंतर्गत हिल्सा, मुस्तांग, मनाङ आणि दार्चुला येथे बीओपी उभारण्याची सुरुवात होत आहे.

- Advertisement -

नेपाळ गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर सीमेवर तपलजंग आणि ओलांगचुंग येथे प्रत्येकी एक बीओपी उभारले जाणार आहे. अलीकडेच सशस्त्र सैन्याने चीनच्या बाजूने हुम्ला आणि हिल्सा नाका येथेही बीओपी उभारण्यात आले आहे.

गृहमंत्री राम बहादुर थापा उर्फ ​​बादल हे भारतीय सीमेवर प्रत्येकी ३.५ कि.मी. अंतरावर बीओपी उभारण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्यासमवेत सशस्त्र दलाच्या आयजीपीसमवेत सल्लामसलत केली होती. त्याअंतर्गत तेथे सेन्टिनल फोर्सची भरती करण्याची तयारी सुरू आहे.

- Advertisement -

येथे उभारण्यात येणार बीओपी

प्रदेश क्रमांक         बीओपी
१                                ३०
२                               १४
५                               ३१
इतर                          १४

वेगाने बदलणार्‍या परिस्थितीत नेपाळ सध्या सीमेवर लक्ष ठेवून आहे. अलीकडेच नेपाळसह भारतानेही चीनच्या सीमेवर आपली कार्यक्षमता वाढविली आहे. तेथेही सैन्य दलाचे सैन्य नियमितपणे गस्त घालत असते. चीन सीमेवर देखील १४ बीओपी उभारण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -