Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Toolkit Case: कोण आहे अनिता लाल?

Toolkit Case: कोण आहे अनिता लाल?

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकरी आंदोलनासंबंधीत टूलकिट प्रकरणी कारवाई केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांवर कारवाई केली आहे. यात आता पुढचे नाव देखील समोर आले आहे. अनिता लाल असे टूलकिट प्रकरणातील संशयितेचे नाव आहे. धालीवालची सहकारी असलेल्या अनिताचे नाव दिल्ली पोलीसांच्या तपासाअंती समोर आले. याआधीही धालीवाल याला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आता दिशा रवीला अटक करत निकिता जँकबरलाही अटक होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूक मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याशिवाय पुनीत आणि फ्रेडरिकवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त खलिस्तानचा अतिरेकी भजनसिंग भिंडरचे नाव देखील प्रखर्षाने समोर येत आहे. त्यामुळे टुलकिटप्रकरणातील संशयितांची नावे दिवसेंदिवस वाढतच आहेत.

धालीवालशी काय आहे अनिता लालचा संबंध ?

अनिता लाल खलिस्तान समर्थक धालीवाल याची मुख्य सल्लागार असल्याचं बोललं जात आहे आहेत. अनिता लाल ही कॅनडामधील व्हॅकूव्हरची रहिवाशी असून ती धालीवालची सहकारी आहे. पेशाने ती व्यवसायिक असली तरी खलिस्थाननी अजेंड्यामध्ये मोठ्य़ा प्रमाणात सक्रिय आहे. खलिस्तानवादी पोएटीक जस्टिस सोसायटीचीही सह संस्थापकसह संचालकीची जबाबदारी सांभावत आहे. अनिताने गेल्या काही दिवसांत सोशल मिडियावर शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक पोस्ट शेयर केल्या आहेत.अनिता लालच्या ट्विटर अकाऊंटवर नजर टाकल्यास ती शेतकरी आंदोलन आणि भारताविरूद्ध सुरु असलेले हॅशटॅग सतत वापरत होती. धालीवालसोबत टूलकिटबाबत झालेल्या झूम मिटिंगमध्येही अनिता लाल सहभागी असल्याची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.

काय आहे टूलकिट ?
- Advertisement -

टूलकिट हे विस्तृत माहितीचे एक डिजीटल पुस्तक आहे. ‘टूलकिट’ म्हणजे एका प्रचार पुस्तिका किंवा नेमक्या विषयासंदर्भातील माहिती देणारी किंवा एखादे काम कशाप्रकारे केले पाहिजे याच्या गाईडलाईन्स सांगणारी माहिती. आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावं, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटमध्ये दिलेली असते. तर ग्रेटानेही याच टूलकिटच्या माध्यामातून लोकांनी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काय केले पाहिजे व ते कसे करायचे याची माहिती दिली. परंतु ग्रेटाने ते ‘टूलकिट’ ट्विटर अकाउंटवरून डिलीट केले. या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर देखील नोंदवला आहे. अमेरिकेते घडलेल्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या आंदोलनातही अशा प्रकारचं टूलकिट वापरल्याची चर्चा पहिल्यांदा झाली. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते.


हेही वाचा- Tool kit प्रकरणातील बीड कनेक्शन…


- Advertisement -

 

- Advertisement -