घरताज्या घडामोडीकेंद्रात वजन असेल तर फडणवीसांनी राज्यासाठी पैसे मिळवून द्यावेत - नाना पटोले

केंद्रात वजन असेल तर फडणवीसांनी राज्यासाठी पैसे मिळवून द्यावेत – नाना पटोले

Subscribe

'पंतप्रधान प्रचारात व्यस्त तर जनता मात्र, कोरोनात त्रस्त आहे', असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

‘देशात एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मात्र, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळजी नसल्याचे दिसून येत आहे. कारण देशाचे पंतप्रधान निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. यावरुन पंतप्रधान प्रचारात व्यस्त तर जनता मात्र, कोरोनात त्रस्त आहे. सध्या ते विना मास्क प्रचार करत आहेत. यातून ते जनतेला काय संदेश देत आहेत?’, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन काळात काय मदत केली हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. आता राज्य सरकारकडून पॅकेजची मागणी करत आहात, जर तुमचे केंद्रात वजन असेल तर फडणवीसांनी राज्यासाठी पैसे मिळवून द्यावेत’, असा टोला नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावला.

मोदींच्या लॉकडाऊनमध्ये लोकांची फरफट

गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्या दरम्यान, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बऱ्याच जणांचे हातावर पोट होते, त्यांचे हाल झाले. त्यावेळी पंतप्रधानांनी जनतेला काय दिले. आता राज्य सरकारकडे विरोधक पॅकेजची मागणी करत आहेत. सध्या भाजप राजकारण करत आहेत. सध्या बंगालच्या निवडणुका सुरु आहेत, यामुळे देशात लॉकडाऊन लावले जात नाही. एकदा का निवडणुका संपल्या का पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लॉकडाऊन लावतील. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची मोदींना काळजी नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे’, घणाघात नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा- महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -