घरदेश-विदेशकर्नाटकातील 'नंदिनी' 100 वर्षे जुनी आहे...; बोम्मईंनी स्पष्ट शब्दांतच सांगितले

कर्नाटकातील ‘नंदिनी’ 100 वर्षे जुनी आहे…; बोम्मईंनी स्पष्ट शब्दांतच सांगितले

Subscribe

नंदिनी अमूलमध्ये विलीन होणार,असे संकेत केंद्रीय मंत्री शाह यांनी कर्नाटक दौऱ्या दरम्यान दिले होते. या विलीनीकरणाबाबत कर्नाटकमधील काॅंग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी भीती व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, गेली शंभर वर्षे नंदिनी दुध उत्पादन करत आहे. नंदिनीची वेगळी ओळख आहे. त्यामुळे नंदिनी अमूलमध्ये विलीन होणार या केवळ वावड्या उठवल्या जातात, असा टोलाही बोम्मई यांनी शिवकुमार यांना मारला.

कर्नाटकः कर्नाटक येथील प्रसिद्ध दुध उत्पादक संघ नंदिनीचे गुजरात येथील अमूल दुध संघात विलीनीकरण होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या विलीनीकरणाचे संकेत दिले होते. मात्र या शक्यतांना मुख्यमंत्री बोम्मई यांनी पूर्णविराम दिला.

नंदिनी अमूलमध्ये विलीन होणार, असे संकेत केंद्रीय मंत्री शाह यांनी कर्नाटक दौऱ्या दरम्यान दिले होते. या विलीनीकरणाबाबत कर्नाटकमधील काॅंग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी भीती व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, गेली शंभर वर्षे नंदिनी दुध उत्पादन करत आहे. नंदिनीची वेगळी ओळख आहे. त्यामुळे नंदिनी अमूलमध्ये विलीन होणार आहे, या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत, असा टोलाही बोम्मई यांनी शिवकुमार यांना मारला.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, नंदिनी व अमूल यांनी दुध उत्पादनातील तंत्रज्ञान व व्यवसायाची माहिती ऐकमेकांंना द्यावी, असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले होते. याचा अर्थ या दोन उत्पादक संघानी एकत्र यावे असा होत नाही. केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा राजकीय हेतूसाठी चुकीचा अर्थ काढला जात आहे, असा आरोपही बोम्मई यांनी केला. त्यामुळे नंदिनी अमूलमध्ये विलीन होणार या शक्यतेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र बोम्मई यांनी केंद्रीय शाह यांच्या संकल्पनेला विरोध केला आहे, असेही बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री शाह यांची सूचना म्हणजे त्यांची तशी ईच्छाच आहे. याला बोम्मई यांनी अस्पष्टपणे नकार दिला आहे, अशी चर्चा आहे. कर्नाटक सीमा वादावरुन महाराष्ट्र व कर्नाटकमधील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यरोपांच्या फैरी रंगल्या होत्या. केंद्रीय मंत्री शाह यांनी या मुद्द्यावर दोन्ही राज्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. शाह यांचे हे आदेश न जुमानता बोम्मई यांनी सीमा भागातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, असा ठराव कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन घेतला. त्यामुळे बोम्मई हे शाह यांच्या आदेशाला जुमानत नसल्याची चर्चा सुरु झाली होती.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -