घरताज्या घडामोडीनारायण राणेंची केंद्रीय मंत्री पदी वर्णी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं मिळणार

नारायण राणेंची केंद्रीय मंत्री पदी वर्णी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं मिळणार

Subscribe

युतीचं सरकार असताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पद शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे होते

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासूनच भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. बुधवारी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता एकूण ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या ४ नेत्यांना मंत्री बनवण्यात येणार आहे. भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागली असून त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. युतीचं सरकार असताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पद शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे होते ते रिक्त असून नारायण राणे यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

भाजप नेते नारायण राणे यांना शिवसेनेकडे असलेलं मंत्रीपद मिळणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनची युती झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षात शिवसेना खासदार अनंत गिते यांच्याकडे अवजड उद्योग मंत्री पद देण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योगमंत्री पद देण्यात आले होते. युती सरकार तुटल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली यामुळे अरविंद सांवत यांना मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर हे या खात्याची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्यावर देण्यात आली होती. हेच मंत्रीपद नारायण राणे यांना मिळणार आहे.

- Advertisement -

राणेंना मंत्री बनवण्याचा फायदा

भाजप नेते नारायण राणे यांची कोकणात मजबूत पकड आहे. यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा कोकणात विस्तार करण्यासाठी नारायण राणे यांची मदत भाजपला होऊ शकते. यामुळे नारायण राणे यांना मंत्रीमंडळमध्ये घेतल्यास भाजपला फायदाच होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचा स्वभाव अक्रमक असल्यामुळे त्यांना मंत्री बनण्याची संधी मिळू शकते. भाजप खासदार अरविंद सावंत यांना देण्यात आलेलं मंत्रीपद अजूनही रिक्त आहे. सध्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर या पदाचा भार आहे. युती तुटल्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे सावंत यांचे मंत्रीपद राणेंना मिळण्याची शक्यता आहे.

या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी

नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -