Narendra Modi : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे 15 व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे (Brics Summit Council) आयोजन करण्यात आले आहे. या परिदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स संघटना आणखी मजबूत होईल, असे वक्तव्य केले आहे. (Narendra Modi Adding new members will strengthen BRICS organization Trust PM Modi)
हेही वाचा – Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल
ब्रिक्स शिखर परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, ब्रिक्सच्या विस्ताराला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. भारताला विश्वास आहे की, नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स संघटना आणखी मजबूत होईल. कारण बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे. यावेळी त्यांनी ब्रिक्सच्या 6 नवीन सदस्य देशांशी भारताचे चांगले संबंध असल्याचेही सांगितले. तसेच ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष, कार्यपद्धती यावर आमचा कार्यसंघ एकत्रितपणे सहमत झाला आहे याचा मला आनंद आहे. ब्रिक्सचा विस्तार करण्याच्या निर्णयामुळे बहुध्रुवीय जगातील अनेक देशांचा विश्वास आणखी दृढ होईल, असेही मोदी म्हणाले.
Speaking at the BRICS Summit. https://t.co/n93U4Vbher
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2023
आम्ही ब्रिक्सला नवी गती देऊ
ब्रिक्सच्या विस्तारासाठी आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे सांगतानाच मोदी म्हणाले की, तीन दिवसांच्या चर्चेतून अनेक सकारात्मक परिणाम समोर आल्याचा मला आनंद आहे. संघटनेतील नवीन सदस्य देशांसोबत काम करून आम्ही ब्रिक्सला नवी गती देऊ शकू, असा मला विश्वास आहे. तसेच या सर्व देशांशी भारताचे अतिशय खोल आणि ऐतिहासिक संबंध असल्याचेही मोदी म्हणाले.
हेही वाचा – Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास
मोदींनी भारताच्या यशस्वी चंद्र मोहिमेचाही उल्लेख केला
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील ‘चांद्रयान-3’ (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. ‘चांद्रयान-3’ चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला यासोबत जगभरातील नेत्यांनीसुद्धा भारताचे अभिनंदन केले आहे. ‘चांद्रयान-3’ च्या यशाबद्दल मिळालेल्या अभिनंदनाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, मानवतेसाठी हे मिशन महत्त्वाचे आहे. जगभरातील शास्त्रज्ञांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. या यशाकडे संपूर्ण मानवजातीचे यश म्हणून पाहिले जात आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे मोदी म्हणाले.