घरElection 2023नरेंद्र मोदी, अमित शहांनी मध्य प्रदेशातील सरकार चोरले, काँग्रेस आमदारांना खरेदी केले;...

नरेंद्र मोदी, अमित शहांनी मध्य प्रदेशातील सरकार चोरले, काँग्रेस आमदारांना खरेदी केले; राहुल गांधींचा आरोप

Subscribe

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये येत्या 17 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक होत असून 3 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात होत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (14 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांच्या पक्षाचे आमदार खरेदी केल्याचा आणि मध्य प्रदेशातील सरकारची ‘चोरी’ केल्याचा आरोप केला आहे. ते मध्य प्रदेशातील विदिशा येथील निवडणूक रॅलीत बोलत होते. (Narendra Modi Amit Shah stole Madhya Pradesh government, bought Congress MLAs Rahul Gandhis allegation)

हेही वाचा – कदम-कीर्तिकरांच्या वादाने ओलांडल्या सर्व मर्यादा; गजाभाऊंच्या बायकोचाही उल्लेख

- Advertisement -

2020 मध्ये कमलनाथ सरकार पडण्यास कारणीभूत धरताना 22 आमदारांच्या बंडखोरीचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी दावा केला की, भाजपाने याठिकाणी जनतेचा आवाज “चिरडला” आहे. 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 114 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. अपक्षांचा पाठिंबा घेऊन काँग्रेसने सरकारही स्थापन केले. मात्र, कमलनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर 15 महिन्यांनी आमदारांच्या राजीनाम्यामुळे आमचं सरकार पडले. नंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 109 जागांसह सरकार स्थापन केल्याचे राहुल गांधी म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी सरकारसाठी काँग्रेस पक्षाची निवड केल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी उपस्थितांना म्हटले की, तुम्ही भाजपाला मत न देता काँग्रेस पक्षाला मत दिलं. परंतु त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी म्हणजेच नरेंद्र मोदी, शिवराज सिंह चौहान आणि अमित शहा यांनी आमदारांना विकत घेतले, स्पष्टच सांगायचं झालं तर आमदारांना चोरले. मध्यप्रदेशमधून निवडून आलेलं सरकार चोरलं. कोट्यवधी रुपये देऊन आणि काँग्रेस पक्षाचे आमदार विकत घेतले. तुमचे निर्णय, तुमच्या हृदयाचा आवाज भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांनी चिरडून टाकल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Israel Hamas War : गाझापट्टीवरील हमासचे नियंत्रण संपले; इस्रायल संरक्षणमंत्र्याचा दावा

द्वेषाच्या बाजारात आमचे प्रेमाचे दुकान 

काँग्रेस मध्य प्रदेशात भाजपला हाकलून देईल, अशी शपथ घेतल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही भाजपशी लढलो. कर्नाटकात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही त्यांना पळवून लावले, पण द्वेषाने नाही. कारण आम्ही ‘द्वेषाच्या बाजारात’ ‘प्रेमाचे दुकान’ उघडले आहे. आम्ही अहिंसेचे सैनिक आहोत, त्यामुळे आम्ही मारत नाही. पण आम्ही त्यांचा प्रेमाने पाठलाग केला. आम्ही त्यांना सांगितले की, त्यांच्यासाठी याठिकाणी जागा नाही, इथे आता काँग्रेस पक्षाचे सरकार येईल, असा विश्वासही राहुल गांधी यांना व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -