घरदेश-विदेशNarendra Modi : पंतप्रधानांनी संसदेत सांगितली 'मोदी 3.0' ची ब्लू प्रिंट

Narendra Modi : पंतप्रधानांनी संसदेत सांगितली ‘मोदी 3.0’ ची ब्लू प्रिंट

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मोदी 3.0’ ची भविष्यवाणी आणि दावा केला आहे. आज सुमारे 90 मिनिटे केलेल्या भाषणात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या धोरणांची ब्लू प्रिंट दिसून आली. (Narendra Modi Blue print of Modi 3.0 told by Prime Minister in Parliament)

काँग्रेस पक्ष कुटुंबाभिमुख आणि निराशावादी असल्याचे सांगत त्यांनी तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा, नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी ‘मोदी 3.0’ या सरकारच्या ब्लू प्रिंटचे वर्णन करताना नरेंद्र मोदी यांनी भारताला बुलेट ट्रेन, एआय, मेगा टुरिझम इंडस्ट्री सारखी हमी दिली. तसेच विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी ‘मोदी 3.0’ आवश्यक असल्याचे म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Bihar Politics : फ्लोअर टेस्टआधीच जेडीयूचे 17 आमदार बेपत्ता; तेजस्वी यादव यांच्या पत्नीची पोस्ट चर्चेत

पाच वर्षांत मोफत घर, शौचालय, नळाला पाणी देण्याची हमी

देशाच्या विकासात मोदी सरकारचे योगदान आणि भविष्याची रूपरेषा सांगताना नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षांत देशाला विकासाच्या शिखरावर नेण्याचा रोडमॅप मांडला. यावेळी गरीबांसाठी मोफत घरे, शौचालये, नळाचे पाणी, धान्य आणि उपचार याबाबत पुढील 5 वर्षांची हमी देण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांना सन्मान निधी, साठवणूक, तंत्रज्ञान, नॅनो खत, सौरऊर्जेपासून शून्य वीज, प्रत्येक घरापर्यंत पाईप गॅस, बुलेट ट्रेन ते सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन ते नैसर्गिक शेती अशी हमीही दिली.

- Advertisement -

डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवणार 

आमची तिसरी टर्म फार दूर नाही, असा दावा करत मोदी म्हणाले की, काही लोक याला ‘मोदी 3.0’ म्हणतात. त्यामुळे ‘मोदी 3.0’ विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरेल. पुढच्या पाच वर्षांत भारतात डॉक्टरांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढेल, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढेल, देशात उपचार खूप स्वस्त होतील. येत्या पाच वर्षांत प्रत्येक गरीब घरात नळाचे कनेक्शन असेल. येत्या काही वर्षांत गरिबांना पीएम आवास देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत सौरऊर्जेमुळे वीज बिल शून्य होणार असून योग्य नियोजन केल्यास लोक घरपोच वीज निर्माण करून विकू शकतील, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

आपल्या तरुणांची ताकद जगाला दिसेल 

नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या पाच वर्षांत आपल्या तरुणांची ताकद संपूर्ण जगाला दिसेल. आमचे तरुण स्टार्टअपच्या माध्यमातून युनिकॉर्न ओळख निर्माण करतील. येत्या पाच वर्षांत रेकॉर्डचे पेटंट घेतले जातील. येत्या 5 वर्षात गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही जलद आणि आलिशान प्रवासाच्या सुविधा मिळणार आहेत. येत्या 5 वर्षात आपला देश स्वावलंबी होईल. त्यामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत देशाची क्षमता दिसून येईल.

पाच वर्षांत देशात बुलेट ट्रेन दिसेल

नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काही वर्षांत आपण ग्रीन हायड्रोजन आणि लिथियमच्या क्षेत्रात जगाला नवी दिशा दाखवू. शेतकऱ्यांना रसायनांऐवजी नैसर्गिक फोमिंगकडे घेऊन जाऊ, यामुळे त्यांचा विकास होईल. येत्या पाच वर्षात ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल, त्याठिकामी भारताचा ध्वज फडकवला जाईल. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनचा विकासही येत्या 5 वर्षात देशाला दिसेल. मेड इन इंडिया सेमीकंडक्टर्स असतील. तसेच एआय भारतात सर्वाधिक वापरले जाईल, असेही मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -