घरट्रेंडिंगमोदींनी पूर्ण केले 'फिटनेस चॅलेंज'.. शेअर केला Video

मोदींनी पूर्ण केले ‘फिटनेस चॅलेंज’.. शेअर केला Video

Subscribe

सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. विराट कोहली याने दिलेले ‘फिटनेस चॅलेंज’ मोदींनी पूर्ण केले असून, त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात मोदांच्या याच व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करत मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी तसंच टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना हे फिटनेस चॅलेंज दिले आहे. याशिवाय मोदींंनी चाळीशीच्या वरील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांना देखील फिटनेस चॅलेंज दिले आहे.

 

- Advertisement -

विराटचे चॅलेंज केले पूर्ण

काही दिवसांपूर्वी देशभरात ‘फिटनेस’ चॅलेंजची जोरदार लाट आली होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने २३ मे रोजी, व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्याने पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्र सिंघ धोनी आणि पंतप्रधान मोदीं यांना हे फिटनेस चॅलेंज दिले होते. विराटचे चॅलेंज स्विकारत मोदींना लवकरच एक्ससाईज करतानाचा एक व्हिडीओ आपण शेअर करु असे ट्वीटरवरुन जाहीर केले होते.

- Advertisement -

 

मोदी होणार का ट्रोल ?

पंतप्रधान मोदींनी शेअर केलेला फिटनेस चॅलेंजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.  या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रीया उमटाताना दिसत आहेत. काहींनी मोदींच्या फिटनेस व्हिडीओचं कौतुक केलं आहे, तर काही लोकांनी ‘ मोदीजी देशात अन्य अनेक महत्वाच्या समस्या आहेत, आधी त्या सोडवण्याचं चॅलेंज घ्या..’ अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान एकीकडे देशात सुरक्षेची किंवा इंधन दरवाढीची समस्या भेडसावत असताना, मोदींच्या या व्हिडीओवर काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्षांकडून काही प्रतिक्रिया उमटणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -