घरदेश-विदेशNarendra Modi: ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची हमी नाही ते मोदींच्या गॅरंटीवर बोलतात;...

Narendra Modi: ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची हमी नाही ते मोदींच्या गॅरंटीवर बोलतात; मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आज, बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज, बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘ज्या काँग्रेसने ओबीसींना संपूर्ण आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीच आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या लायकीचे मानले नाही, ते आज आरक्षणावर बोलत आहेत. ते केवळ आपल्या कुटुंबालाच भारतरत्न देत राहिले. (Narendra Modi Congress which has no guarantee of its leaders talks on Modi s guarantee PM Modi s Attack in Rajya Sabha)

राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ते (काँग्रेस) आता प्रचार करत आहेत आणि आम्हाला सामाजिक न्यायाचा धडा शिकवत आहेत. ज्यांना नेता म्हणून कोणतीही हमी नाही ते आज मोदींच्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असा टोला त्यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधींना लगावला.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, यापूर्वी माजी पंतप्रधान पंडीत नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रेही लिहिली होती, त्यात असं लिहिलं होतं की – ‘मला कोणतेही आरक्षण आवडत नाही. विशेषतः नोकऱ्यांमध्ये आरक्षण तर मुळीच नाही. अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या अशा कोणत्याही पावलांच्या मी विरोधात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हे लोक जन्मतःच आरक्षणाचे विरोधक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी खर्गेंनांही टोला लगावला. ते म्हणाले खर्गेंनी NDA च्या 400 जागा येतील, असा आशीर्वाद दिला. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की, ते 40 जागा तरी वाचवू शकतील.

- Advertisement -

पंतप्रधान म्हणाले की, जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेनं बळं दिलं आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Security Breach : संसदेनंतर आता गृहमंत्रालयाची सुरक्षाही भेदली! तरुण अटकेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -