घरअर्थजगतनरेंद्र मोदी वैयक्तिक मदत करत नाहीत, ते धोरणात्मक चर्चा करतात - गौतम...

नरेंद्र मोदी वैयक्तिक मदत करत नाहीत, ते धोरणात्मक चर्चा करतात – गौतम अदानी

Subscribe

Gautam Adani | केरळमध्ये पिनराई विजयन यांच्यासोबत काम करत आहोत, बंगालमध्ये ममता दीदींसोबत, नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांसह अनेकांसोबत आमचं काम सुरू आहे. या कोणत्याच सरकारचा आम्हाला काहीच त्रास नाही, असंही मी दाव्यासकट सांगू शकतो, असं गौतम अदानी म्हणाले.

Gautam Adani | प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात मैत्रीत्वाचे संबंध आहेत, म्हणूनच गौतम अदानी यांचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे, असा दावा केला जातो. मात्र, गौताम अदानी यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपाचं राज्य नसलेल्या राज्यातही माझा व्यवसाय आहे, असं गौतम अदानी (Gautam Adani) म्हणाले. प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करणे हे आमचं उद्दीष्ट्य आहे. आम्हाला या एका गोष्टीचा आनंद आहे की देशातील २२ राज्यांत अदानी समूह काम करत आहे आणि त्यातील काही राज्यात भाजपाचं सरकार नाही, असं गौतम अदानी म्हणाले. आप की अदालत या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – ITR Update: मोदी सरकारचं गिफ्ट, आता 75 वर्षांवरील नागरिकांना ITR भरण्याची गरज नाही

- Advertisement -

ते म्हणाले की, केरळमध्ये पिनराई विजयन यांच्यासोबत काम करत आहोत, बंगालमध्ये ममता दीदींसोबत, नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांसह अनेकांसोबत आमचं काम सुरू आहे. या कोणत्याच सरकारचा आम्हाला काहीच त्रास नाही, असंही मी दाव्यासकट सांगू शकतो.

पंतप्रधान नेरंद्र मोदींकडून तुम्ही कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. त्यांच्याशी धोरणात्मक चर्चा तुम्ही करू शकता. जे धोरण तयार केलं जातं ते सर्वांसाठी असतं. ते केवळ अदानी समूहासाठी तयार होत नाही, असं गौतम अदानी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता! Amazon मध्ये १८ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

आमच्या समूहाला प्रमोट केलं जातंय, असा आरोप होतोय. पण यामुळे बँका आणि सामान्यांची बचत धोक्यात येऊ शकते. सात ते आठ वर्षांमध्ये समूहाच्या कर्जामध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढलं आहे. एकूण कर्जाच्या तुलनेत तीन ते चार पट आमची संपत्ती आहे, असंही अदानी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -