नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 22 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता आज वितरीत करण्यात आला. देशातील जवळपास 9.80 कोटी शेतकऱ्यांना या योजनेताल लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली. भागलपूर येथे किसान सन्मान निधीचा सहावा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. (Narendra Modi has deposited the 19th installment of the PM Kisan Yojana and 9.80 crore farmers have received the benefit)
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करण्यात आला. देशभरातील 9.80 कोटी शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचा लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2 हजार दिले जातात. शेतकरी या रकमेचा वापर शेतीशी संबंधित गरजा जसे की खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी करू शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्यांना नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पीएम-किसान मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या पेमेंटची स्थिती आणि अर्जाबद्दल माहिती मिळवू शकतात. पीएम किसान पोर्टल शेतकऱ्यांना त्यांच्या पेमेंट स्थिती आणि अर्जाची माहिती सहज उपलब्ध करून देते. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान किसान योजना पूर्णपणे डिजिटल आहे. तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना या सारख्या इतर योजना देखील सरकारने जोडल्या आहेत. शेतकरी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर त्यांची नोंदणी स्थिती आणि हप्त्याची माहिती तपासू शकतात. पीएम किसान योजनेसाठी आधारशी जोडलेली बँक खाती अनिवार्य करण्यात आली आहेत, ज्यामुळे भ्रष्टाचार रोखता येऊ शकतो.
खात्यात पैसे आल्याचे कसे तपासावे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी खात्यात आला की नाही, हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in वर जावे लागेल. यानंतर शेतकऱ्यांना “Know Your Status” पर्यायावर क्लिक करावा लागेल. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. मग तुम्हाला Get Data वर क्लिक करावे लागेल. जर तुमच्या लाभार्थी स्थितीवर ई-केवायसी च्या समोर NO लिहिले असेल तर तुमचा हप्ता थांबला असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला तत्काळ तुमच्या खात्याचे ई-केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे. पण जर तुम्ही ई-केवायसी केले असेल आणि तरीही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही [email protected] वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर – 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता.
हेही वाचा – Javed Akhtar : विराट कोहली जिंदाबाद म्हटल्यावर जावेद अख्तर ट्रोल, युजरच्या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर