घरCORONA UPDATEकोरोनाशी लढाई म्हणजे जीवन मरणाशी लढाई : पंतप्रधान मोदी

कोरोनाशी लढाई म्हणजे जीवन मरणाशी लढाई : पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा पाचवा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मधून पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. मोदींचा हा ६३ वा ‘मन की बात’चा संवाद कार्यक्रम आहे. तर यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा मोदी आज ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधत आहेत. ‘मन की बात’मधून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला गांभीर्याने घ्या याकडे देशाच्या नागरिकांचे लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बातमधून नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. कोरोनाला गांभीर्याने घ्या, काही नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत. कोरोनापासून वाचण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळावीच लागेल. नियम तोडणारे स्वत:च्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनला गांभीर्याने घ्या. घराबाहेर पडू नका, कोरोनातून वाचायचं असेल तर हा उत्तम उपाय आहे.  कोरोना बरा होऊ शकतो… घाबरू नका.

- Advertisement -

कोठोर निर्णयामुळे गरीब जनतेचे जगणं कठीण झाले आहे. गरीब जनतेची माफी मागतो. पण यावेली त्यांनी सगळ्या जनतेला गरिबांना जास्तीत जास्त मदत करा असे आवाहन केले आहे. यावेली त्यांनी  करोनातून बरे झालेल्या रूग्णांशी संवाद साधला. कोरोनावर कशी मात केली याची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर करोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांशी ही देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. डॉक्टर सध्या कोणत्या परिस्थीतीत आहेत, रूग्णांशी कशाप्रकारे संवाद साधत आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे यावेळी जाणून घेतले.

 

- Advertisement -

पथ्य आणि योग्य उपचाराने करोनावर मात करता येऊ शकते. डॉक्टर आणि सरकारने सांगतिलेल्या सुचनांचे पालन करा. डॉक्टर आणि नर्स, पोलिसांचे मानले आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -