घरताज्या घडामोडीNarendra Modi in US : अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये, मोदींचा...

Narendra Modi in US : अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये, मोदींचा पाकला ईशारा

Subscribe

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाईसाठी होता कामा नये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून पाकिस्तानला थेट इशारा देत दहशतवादाच्या मुद्द्यावर खडसावले. दहशतवादाचा राजकीय टूलच्या स्वरूपात वापर करणाऱ्या देशांना हे समजण्याची गरज आहे की दहशतवाद हा त्यांच्यासाठीही धोका आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधानांनी दहशतवादाचा फटका हा पाकिस्तानलाही बसू शकतो असे सांगितले. अफगाणिस्तानच्या जागेचा वापर हा दहशतवाद पसरवण्यासाठी न होणे गरजेचे आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या नाजूक स्थितीचा वापर हा आपल्या स्वार्थासाठी टूलच्या स्वरूपात वापर करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राच्या ७६ व्या महासभेला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचा दहशतवादासाठीचा होणारा वापर पाहता इशारा दिला.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला अफगाणिस्तानातील जनता, महिला आणि मुले तसेच अल्पसंख्यांक समुदायाची मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानची मदत ही आपलीही तितकीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या संकटाने अनेक गोष्टी स्पष्ट केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता या भूमिचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी होता कामा नये, असा इशारा त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता थेट दिला. त्यामुळेच पाकिस्तानातील सद्यपरिस्थितीचा कोणीही दुरूपयोग करता कामा नये. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर हा आपल्या स्वार्थासाठी करता कामा नये. सध्या अफगाणिस्तानातील जनता ही अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना मदत करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात कोरोना लसीचे निर्मिती करा, मोदींचे ‘UNGA’मध्ये जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना आवाहन


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -