घरदेश-विदेशNarendra Modi : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती

Narendra Modi : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती

Subscribe

Narendra Modi : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सध्या एनडीए सोबत देशातील 32 पक्ष सोबत असून इंडिया आघाडीसोबत 28 पक्ष आहेत, मात्र आता एनडीएची ताकद वाढणार आहे. तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) अण्णाद्रमुकसोबत भाजपाची (BJP) युती तुटली असली तरी त्यांना कर्नाटकमध्ये (Karnataka) दिलासा मिळाला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला आहे. (Prime Minister Narendra Modi party called Family Private Party has formed an alliance with NDA JDS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल महिन्यात जनता दल सेक्युलर पक्षाला फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जेडीएससोबत ही युती केली आहे. असे असले तरी जेडीएसला आपले अस्तित्व वाचवण्यासाठी ही युती आवश्यक होती. यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत  झालेल्या दारुण पराभवामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आले आहेत.

- Advertisement -

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. या युतीला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करून दुजोरा दिला आहे. आमचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, जेडीएसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांचे एनडीएमध्ये मनापासून स्वागत करतो. यामुळे एनडीए आणि पंतप्रधानांची दूरदृष्टी आणखी मजबूत होईल.

- Advertisement -

या महिन्याच्या सुरुवातीला भाजपाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बीएस येडियुरप्पा यांनी दोन्ही पक्षांमधील युतीचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी कर्नाटकातील लोकसभेच्या 28 पैकी चार जागा जेडीएलसोबत वाटून घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर मजबूत होतील. बीएस येडियुरप्पा यांनी दावा केला होता की, दोन्ही पक्षांच्या युतीमुळे कर्नाटकात लोकसभेच्या 25 ते 26 जागा जिंकता येतील. कर्नाटकात दोन्ही पक्ष जवळ आल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कडवी टक्कर मिळू शकते, असे मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -