घरदेश-विदेशपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर मोदींचा उपाय, राज्यांना दिला हा सल्ला

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर मोदींचा उपाय, राज्यांना दिला हा सल्ला

Subscribe

पंतप्रधान मोदींची ही बैठक एक प्रकारे कोरोना व्हायरसवर होती. पण इथे तेलाच्या वाढत्या किमतींचा उल्लेखही आला. आर्थिक निर्णयांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा जनतेवरील बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती.

नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी राज्य सरकारांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने उशीर झाला, पण आता राज्य सरकारांनी तेलावरील कर कमी करावा, असंही त्यांनी सांगितलं. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान मोदींची ही बैठक एक प्रकारे कोरोना व्हायरसवर होती. पण इथे तेलाच्या वाढत्या किमतींचा उल्लेखही आला. आर्थिक निर्णयांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा जनतेवरील बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर राज्य सरकारांनाही व्हॅट कमी करण्यास सांगण्यात आले. काही राज्यांनी केंद्राची आज्ञा मानून जनतेला दिलासा दिला, मात्र काही राज्यांनी तसे केले नसल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. महाराष्ट्रासह केरळ, आसाम, तेलंगणा आणि पश्चिम बंगालने पेट्रोल आणि डिझेवरील दर कमी करावा, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

तसेच सध्या त्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, पण असे करणे अन्यायकारक आहे, कारण यामुळे शेजारील राज्यांचेही नुकसान होते. लोक तेथे तेल इंधन भरण्यासाठी जातात. कर कपात करणाऱ्या राज्याला महसुलाचे नुकसान होते, परंतु यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कबूल केले. तसेच मी कोणावरही टीका करत नाही. राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने केंद्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचा नागरिकांवर बोजा पडत राहिला,’ असं म्हणत पंतप्रधानांनी थेट बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलंं.


विशेष म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरही नरेंद्र मोदींनी भाष्य केलंय. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व स्वरूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात हे आपण युरोपातील देशांकडे बघून पाहू शकतो. तसेच वयोगटानुसार सर्व पात्र लहान मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्याला पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढत्या उष्णतेच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना वाढत आहेत. गेल्या वर्षी अनेक रुग्णालयांना आग लागली, ती अत्यंत क्लेशदायक परिस्थिती होती. मी सर्व राज्यांना विनंती करतो की आपण आतापासून रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करावे, सुरक्षा व्यवस्था करावी, असंही नरेंद्र मोदींनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -