घरराजकारणगुजरात निवडणूकमाझ्यावर दडपशाही वाढेल, शॉर्टकटचे राजकारण घातक, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

माझ्यावर दडपशाही वाढेल, शॉर्टकटचे राजकारण घातक, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदींनी गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल भाजप कार्यकर्ते, उमेदवारांचे अभिनंदर केले, तसेच जनतेचे जाहीर आभार मानले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस आणि आपवरही हल्लाबोल केला आहे. मोदींनी आज काँग्रेसवर पुन्हा घराणेशाहीचा आरोप केला आहे. तर ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवत त्यांनी गुजरातचा अपमान केल्याबद्दल गुजरातच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी मोदींनी केली आहे.

माझ्यावर दडपशाही वाढणार

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 2002 नंतर माझ्या आयुष्यात असा एकही क्षण आला नाही की, ज्याची खिल्ली उडवली गेली नाही, पण मी स्वतःला बदलत राहिलो, शिकत राहिलो. टीकाही खूप काही शिकवून गेली. आपली शक्ती वाढवायची आहे. सर्वात कठोर खोटे आरोप सहन करावे लागतील. माझ्यावर आणि तुझ्यावरही दहपशाही आरोप वाढणार आहेत. कारण त्यांना पराभव पचवता येणार नाही. आपल्याला सहनशीलता वाढवावी लागेल. असं म्हणत 2047 मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू, तेव्हा आपल्या तरुणांच्या हातात विकसित भारत सोडू. असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

- Advertisement -

राजकारणातील शॉर्टकट देशासाठी घातक

आम्ही केवळ घोषणा करण्यासाठी घोषणा करत नाही. आम्ही केलेल्या प्रत्येक घोषणेमागे एक रोडमॅप असतो. देशाला आज शॉर्टकट नको आहेत. देशाचा मतदार एवढा जागरूक आहे की, त्याच्या हिताचे काय आणि काय नाही हे कळते. शॉर्टकट राजकारणाचे तोटे त्यांना माहीत आहेत. देश समृद्ध असेल तर सर्वांची समृद्धी निश्चित आहे. असही मोदी म्हणाले.

- Advertisement -

निवडणुकीत नौटंकी करून काहीही फायदा होणार नाही

पीएम मोदी पुढे म्हणाले की, आपल्या पूर्वजांना अनुभवाचे अफाट ज्ञान होते. उत्पन्न हे खर्चाच्या बरोबरीचे असते ही म्हण आपल्या पूर्वजांनी दिली आहे.’आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ ही म्हण आमच्या पूर्वजांनी सांगितली आहे. हा हिशोब असाच राहिला तर काय परिस्थिती असेल हे आपण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये पाहत आहोत. त्यामुळे आज देश सतर्क आहे. यावेळी देशातील इतर राजकीय पक्षांना सल्ला देताना मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने लक्षात ठेवावे की, निवडणुकीत नौटंकी करून काहीही फायदा होणार नाही. या जनादेशातून आणखी एक संदेश जातो आहे, तो म्हणजे समाजातील अंतर वाढवून, देशासमोर नवी आव्हाने निर्माण करून, तात्कालिक लाभ घेण्यात मग्न असलेले राजकीय पक्षांना देशातील जनता, देशातील तरुण पिढी पाहत आहे, समजून घेत आहे असंही मोदी म्हणाले.

आपली सहिष्णुता आणि आकलनशक्ती वाढवायची आहे. या निवडणुकांमध्ये आपल्याला अनेकांना जाणून घेण्याची आणि ओळखण्याची संधी मिळाली आहे. स्वत:ला तटस्थ म्हणवणाऱ्यांची माहिती देशासाठी आवश्यक आहे. हिमाचल, उत्तराखंडमध्ये किती लोकांचे डिपॉझिट जप्त झाले, त्या लोकांनाही कळायला हवं. राजकारणात सेवेची भावना ठेवून सेवकासारखे काम करणे म्हणजे अपात्रता मानली जात आहे. आमचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दोन लाख मतांनी विजयी झाले, ही मोठी गोष्ट आहे. पण कंत्राटदारांचा तराजू काही औरच आहे. म्हणूनच आपली सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढवून पुढे जावे लागेल, असही मोदी म्हणाले.


घराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत, तरुणांना विकास हवाय; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -