घरक्रीडाखेळात भारताची कामगिरी ऐतिहासिक, आता ऑलिम्पिकसाठी तयारी करा; मोदींचं खेळाडूंना आवाहन

खेळात भारताची कामगिरी ऐतिहासिक, आता ऑलिम्पिकसाठी तयारी करा; मोदींचं खेळाडूंना आवाहन

Subscribe

कॉमन वेल्थ २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंशी संवाद साधला. तुम्ही फक्त देशाला मेडल दिलं नाही तर एक भारत श्रेष्ठ भारत योजनेला सशक्त केलं आहे, असं कौतुकौद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आज विजय उत्सव आहे. खेळाडूंनी देशाचा मान वाढवला आहे. प्रत्येक खेळाडू प्रशंसेस पात्र आहे, असंही मोदी म्हणाले.यावेळी केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकरू, खेळ राज्य मंत्री निसिथ प्रमाणिक उपस्थित होते.

हेही वाचा – CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने जिंकले 200 वे सुवर्णपदक

- Advertisement -

तुम्ही तुमच्या दिनक्रमातून वेळ काढून माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच माझ्या घरी आलात. इतर भारतीयांप्रमाणेच तुमच्याशी बोलून मला अभिमान वाटत आहे. खेळाडूंच्या मेहनत आणि प्रेरणादायी कामगिरीमुळे देश आजादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. कॉमन वेल्थ खेळातील एतिहासिक कामगिरीसह देशाने पहिल्यांदाच प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करणाऱ्या, त्यात सहभागी होणाऱ्या आणि विजेत्या स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले खेळाडू भारतात येताच विमानतळावर जल्लोषात स्वागत

- Advertisement -

कॉमनवेल्थ सुरू होण्याआधी मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही परत जेव्हा याल तेव्हा आपण विजयोत्सव साजरा करू. तुम्ही विजयी बनूनच परत याल अशी मला खात्री होती. २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान जवळपास २०० भारतीय एथलिटने बर्घिंगममध्ये कॉमलनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये १६ विविध खेळात ६१ पदके जिंकली. यापैकी २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य मिळवून चौथे स्थान प्राप्त केले आहे.


कॉमन वेल्थ स्पर्धेत भारताने अतुलनिय कामगिरी केली आहे. अशीच मेहनत येणाऱ्या एशिअन आणि ऑलिम्पिकसाठीही करा, असं आवाहन मोदींनी खेळाडूंना केलं आहे. तुम्ही खेळातच नाही तर इतर क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहन देत आहात, संकल्प आणि लक्ष्याला जोड आहात, त्यामुळे तुमची कामगिरी इतरांना प्रोत्साहन देत आहेत, असंही मोदी म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -