Homeदेश-विदेशModi Vs Rahul Gandhi : युवराज ना लिफ्ट होत आहेत ना लाँच;...

Modi Vs Rahul Gandhi : युवराज ना लिफ्ट होत आहेत ना लाँच; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा युवराज असा उल्लेख केला. (Narendra Modi Vs Rahul Gandhi Yuvraj is neither being lifted nor launched Modi targets Rahul Gandhi)

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

नरेंद्र मोदी म्हणाले की, मी स्वतंत्र भारतात जन्मलो, माझी स्वप्नेही स्वतंत्र आहेत, जे गुलामगिरीची मानसिकता जगतात, त्यांच्याकडे दुसरे काही नसते, तेच जुने कागद घेऊन फिरतात. पण आज आपल्या नेत्याची कोणतीही हमी नसलेली काँग्रेस मोदींच्या हमीभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र मला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे विशेष आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी लोकसभेत मनोरंजनाची कमतरता भरून काढली आहे.

नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, कधी कधी लोकसभेत मनोरंजनाची संधी मिळते, परंतु आजकाल ते इतर ड्युटीवर असल्यामुळे कमी झाले आहे. पण जी काही कमतरता लोकसभेत जाणवली, ती तुम्ही राज्यसभेत भरून काढली. खर्गे यांनी स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला, मला वाटतं त्या दिवशी खर्गे यांनी सिनेमातलं ते गाणं ऐकलं असेल, अशी संधी पुन्हा कुठे मिळणार? त्यांनी कमांडो नसतानाही चौकार आणि षटकार मारण्यात मजा घेतली.

हेही वाचा – PM Narendra Modi : आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; राहुल गांधींच्या टीकेला मोदींचं उत्तर

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, ‘मी ऐकले आहे की लोकशाहीत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ऐकण्याची जबाबदारी आमची आहे. आज जे काही घडले आहे ते मी देशासमोर ठेवले पाहिजे. हे ऐकल्यावर माझा विश्वास पक्का झाला की, हा पक्ष (काँग्रेस) विचार करण्यापलीकडे जुना झाला आहे. त्यांचे विचार जुने झाले आहेत, त्यांचे कार्यही जुने झाले आहे. एवढा मोठा पक्ष, देशावर इतकी दशके राज्य करणारा पक्ष काही वेळातच असा झाला. पण आम्ही आनंदी नाही, तर आम्हीसहानुभूती आहोत. कारण पेशंट असा असेल तर डॉक्टर तरी काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने आपल्या युवराजाला एक नवीन स्टार्टअप दिला आहे. पण काय करणार, त्यांचे युवराज ना लिफ्ट होत आहेत ना लाँच होत आहेत.