Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश

Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश

Subscribe

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यानंतर परदेशातही भारताचा दबदबा वाढला आहे. जागतिक स्तरावर केलेल्या एका सर्वेक्षणात 68 टक्के भारतीयांचे असे मत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) अहवालानुसार दहापैकी आठ भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा खूश होणार आहे. (Narendra Modi will be the Prime Minister for the third time Confidence of Indians abroad BJP happy with survey)

अलिकडच्या काही वर्षांत भारताचा जागतिक प्रभाव वाढला असल्याचे बहुतेकांचे मत आहे. सर्वेक्षणात सहाभागी झालेल्या 55 टक्के लोकांनी पुन्हा एकदा मोदींनाच पसंती दर्शवली आहे. नरेंद्र मोदी 2014 पासून सत्तेत आहेत आणि सलग तिसऱ्यांदा ते पंतप्रधान व्हावेत, असे मतही त्यांनी वर्तविले आहे. जी-20 संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (29 ऑगस्ट) हा अहवाल जारी करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – INDIA आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून महामंथनचे आयोजन

प्यू सेंटरच्या अहवालात परदेशातील लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा वाढला आहे, हे बहुतांश भारतीयांनी मान्य केले आहे. प्यू रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात जगातील 23 देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सहभागात हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणादरम्यान 30861 लोकांना जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना 68 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा प्रभाव जगामध्ये वाढल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ममता बॅनर्जींकडून रक्षाबंधनानिमित्त नवे ऋणानुबंध; राजकीय मैत्रीचे बंधही आणखी बळकट

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान केलेल्या प्यू सर्वेक्षणात इस्रायलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या 73 टक्के लोकांचा भारतावर विश्वास आहे. प्यू रिसर्च सेंटरने भारतातील लोकांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबाबत सर्वेक्षण अहवालात माहिती दिली आहे. अहवालानुसार, बहुतांश भारतीयांना चीन आणि पाकिस्तान आवडत नाही. 67 टक्के भारतीयांनी बीजिंगबद्दल तर, 73 टक्के लोकांनी इस्लामाबादबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले आहे. भारतीयांचा विश्वास अमेरिकेवर वाढला आहे, मात्र रशियावरही कमी झालेला नाही. 65 टक्के भारतीयांचे मत आहे की, अमेरिकेची वृत्ती भारताच्या हिताची आहे तर, 57 टक्के लोक रशियाला आपला मित्र मानताना दिसत आहेत.

- Advertisment -