घरताज्या घडामोडीएके दिवशी देशाचे नाव बदलून नरेंद्र मोदी ठेवण्यात येईल; ममता दीदींची टीका 

एके दिवशी देशाचे नाव बदलून नरेंद्र मोदी ठेवण्यात येईल; ममता दीदींची टीका 

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

कोरोना लसीकरण झाल्यावर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एक दिवस असा येईल, जेव्हा देशाचे नाव बदलून नरेंद्र मोदी ठेवण्यात येईल,’ असे ममता दीदी म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये मार्च ते मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बंगालमधील राजकारण सध्या तापलेले दिसत आहे. सर्व २९४ जागांवर तृणमूल आणि भाजपमध्ये स्पर्धा असल्याचे ममता म्हणाल्या. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा ममता यांना विश्वास आहे. तसेच त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

कोरोना लस नाही, तर मोदी लस

कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यामुळे ही कोरोना लस नाही, तर मोदी लस आहे. मोदी यांनी स्वतःच्या नावे कॉलेजेस सुरु केली, त्यांनी स्टेडियमला स्वतःचे नाव दिले, त्यांच्या नावाची लसही आहे. आता एक दिवस असाही येईल, जेव्हा देशाचे नाव बदलून नरेंद्र मोदी ठेवण्यात येईल, असे ममता बॅनर्जी कोलकाता येथे बोलताना म्हणाल्या. अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियमचे नामकरण करून त्याला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले होते. त्याआधी हे स्टेडियम सरदार पटेल स्टेडियम म्हणून ओळखले जात होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -