घरताज्या घडामोडीलालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन

लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला होता. यावेळी मोदींनी लालू यादवांच्या प्रकृतीची विचारणा केली. तसेच ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना देखील केली. लालू यादव दोन दिवसांपासून हॉस्पिलमध्ये भरती आहेत.

३ जुलै रोजी सायंकाळी पायऱ्यांवरून लालू प्रसाद यादव हे खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या खांद्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्यांना दोन महिने बेड रेस्ट करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

लालू प्रसाद यादव हे राबडीदेवी यांच्या सरकारी निवासस्थानी राहतात. आजच राजदचा स्थापना दिवस होता. याच दिवशी लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने काही भावनिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये लालू रूग्णालयात असल्याचे दिसत आहे. तसेच ते आजारी असल्यासारखे दिसत आहेत.

डॉक्टरांच्या एका पथकाने लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतेची तपासणी केली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; मुख्यमंत्री सुरक्षित


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -