घरदेश-विदेशNari Shakti Bill : स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात...

Nari Shakti Bill : स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला – पंतप्रधान

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक (Nari Shakti Vandan Bill) म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. त्याबद्दल भाजपाच्या मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सांगितले.

हेही वाचा – OBC जनगणनेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी महिला आरक्षण; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

आज प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढला आहे. या निर्णयावर वर्षानुवर्षे चर्चा होईल. कधी कधी एखाद्या निर्णयात देशाचे नशीब बदलण्याची क्षमता असते आणि अशा निर्णयाचे आपण साक्षीदार झालो आहोत. आम्ही एक नवा इतिहास घडताना पाहिला आहे आणि लाखो लोकांनी आम्हाला ही संधी दिली हे आमचे नशीब असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देशातील माता-भगिनी उत्सव साजरा करत आहेत. अमृत ​​काळामध्ये सर्वांच्या प्रयत्नातून विकसित भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केल्याबद्दल देशातील सर्व माता-भगिनींचे अभिनंदन केले. तसेच, सर्व पक्ष आणि खासदारांचे आभार मानले. पक्षीय मतभेद दूर ठेवून सर्वांनीच या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे पंतप्रधानांनी म्हणाले.

जेव्हा पूर्ण बहुमत असलेले स्थिर सरकार असते, तेव्हा देश कसे मोठे निर्णय घेतो आणि मोठे टप्पे कसे पार करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे, दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले नारी शक्ती वंदन विधेयक म्हणता येईल. पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला आहे. देशाला पुढे नेण्यासाठी पूर्ण बहुमत असलेले मजबूत आणि निर्णायक सरकार अत्यंत आवश्यक आहे हे या कायद्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री; आदित्य ठाकरेंचा घणाघात

भाजपा तीन दशकांपासून हे विधेयक समंत करण्यासाठी प्रयत्नशील होती. हे विधेयक मंजूर होणे, हे मोदींच्या गॅरंटीचा पुरावा आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. महिला आरक्षणाच्या लागू करण्यात अनेक अडथळे आले, पण जेव्हा हेतू स्पष्ट असतो तेव्हा सर्व चांगल्या गोष्टी घडतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -