घरताज्या घडामोडीInternational Women's Day- आव्हानांवर मात करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

International Women’s Day- आव्हानांवर मात करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

Subscribe

सायली नंदकिशोर आगवणे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) वनिता जगदेव बोऱ्हाडे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) आणि कमल कुंभार (नारी शक्ती पुरस्कार, 2021) यांनी आपल्या या अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान आणखी उंचावली आहे.

‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, असं खरंतर म्हंटल जातं. पण आपल्यापैकी अनेकांना अपयशाचीच इतकी भीती असते की त्या भीतीपायी आपण काही गोष्टी करायला धजावतच नाही, किंवा त्या मध्येच सोडून तरी देतो. पण काहीजण मात्र हे धाडस करतात आणि त्यात यशस्वी देखील होतात. असेच धाडस करत विविध आव्हानांवर मात करत यशाची वाटचाल करणाऱ्या दिग्गज महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनी सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विजेत्या महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार 2020-21 ‘ प्रदान करण्यात आला. यात महाराष्ट्रातील काही महिलांचाही समावेश होता.

सायली नंदकिशोर आगवणे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) वनिता जगदेव बोऱ्हाडे (नारी शक्ती पुरस्कार, 2020) आणि कमल कुंभार (नारी शक्ती पुरस्कार, 2021) यांनी आपल्या या अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान आणखी उंचावली आहे.

- Advertisement -

तीव्र इच्छाशक्ती, निश्चय आणि समर्पण – सायली नंदकिशोर आगवणे

- Advertisement -

सायली नंदकिशोर आगवणे, या दिव्यांग कथ्थक नृत्यांगनेला 2020 च्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अत्यंत विपरित परिस्थितीत, भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार, प्रसार करण्याच्या कमी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सायली जन्मतःच डाऊन सिंड्रोम या जनुकीय आजाराने सायली ग्रस्त आहे. हा आजार केवळ शारीरिकच नाही, तर एकूण व्यक्तिमत्वाचा विकास खुंटवणारा असतो. मात्र हा आजार देखील सायलीची नृत्य शिकण्याची जिद्द कमी करु शकला नाही.

पर्यावरण हेच जीवन आहे! चला, त्याचे संरक्षण करूया आणि जोपासना करूया!! – वनिता जगदेव बोराडे 

वन्यजीव संवर्धनासाठी, विशेषतः सर्पजातीला सुरक्षित ठेण्यासाठी आणि याविषयी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल वनिता जगदेव बोराडे यांना नारी शक्ती 2020 या पुरस्काराने गौरविण्यात आले.

समाजात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या भितींपैकी आपल्या सर्वांच्याच मनात असणारी भीती म्हणजे ओफिडीयोफोबिया म्हणजेच सापांची भीती. अगदी निपचित पडलेला किंवा अजिबात हालचाल न करणारा साप आपल्या दृष्टीस पडला तरी आपण घाबरून जातो. मात्र वनिता जगदेव बोराडे  सापांना पकडून वाचविणारी जगातील पहिल्या महिला आहेत. त्यांनी आतापर्यंत 51,000 सापांना सुरक्षितपणे वाचवून जीवदान दिले आहे.  नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

आपण एकाच वेळी किमान तीन व्यवसाय केले पाहिजेत – कमल कुंभार 

सामाजिक उद्योजिका, कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. पशुपालन क्षेत्रात महिला स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दिलेल्या उत्तम योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गरिबीशी लढा देत कोमल कुंभार वयाच्या 23 व्या वर्षी उद्योजिका झाल्यात. त्यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावरील कृषी संलग्न संस्थांकडून प्रशिक्षण घेतले आहे. जेव्हा त्यांनी आपला उद्योग सुरु केला, तेव्हा त्यांना, उद्योग चालवणे, उत्पादनांचे मार्केटिंग, जाहीराती आणि त्यात येणारे अडथळे याविषयी काहीही माहिती नव्हती. हे सगळे ज्ञान त्यांनी आपल्या अनुभवातून मिळवले. त्यांनी स्वतःचे एक सूक्ष्म- व्यावसायिक जाळे देखील निर्माण केले आणि त्यांच्यासारख्या महिलांना सक्षम करत स्वयंउद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन दिले.


हेही वाचा – Election Results 2022: पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची बैठक, काँग्रेस नेतृत्व बदलाची शक्यता?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -