घरताज्या घडामोडी'मून रॉकेट' शनिवारी प्रक्षेपित करण्याचा नासाकडून प्रयत्न, मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी

‘मून रॉकेट’ शनिवारी प्रक्षेपित करण्याचा नासाकडून प्रयत्न, मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी

Subscribe

नासा येत्या शनिवारी ‘मून रॉकेट’ प्रक्षेपित करण्याचा नवीन प्रयत्न करणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चाचणी प्रक्षेपण आयोजित करण्याची योजना होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम अयशस्वी ठरली. त्यामुळे नासाच्या मून रॉकेटचे उड्डाण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता नासा पुन्हा एकदा त्यासाठी शनिवारी प्रयत्न करणार आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रक्षेपणाच्या अंतिम तयारीदरम्यान इंधनाची गळती आणि नंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं सोमवारी सकाळी त्याचं नियोजित प्रक्षेपण पुढं ढकलावं लागलं. हे लाँचिंग पाहण्यासाठी हजारो लोकं जमले होते. यामध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचाही समावेश होता.

- Advertisement -

AFFIच्या अहवालानुसार, नासामधील Artemis 1 मिशन मॅनेजर माईक सराफिन यांनी काल मंगळवारी मीडियाशी संवाद साधत नवीन प्रक्षेपण प्रयत्नाची तारीख जाहीर केली. यासोबतच ते म्हणाले की, अंतराळवीरांना चंद्रावर परत आणण्यासाठी अमेरिकन कार्यक्रमातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अंतराळयानाबद्दल बोलायचं झालं, तर ते 322 फूट किंवा 98 मीटर लांब आहे. जे नासाद्वारे तयार केलेलं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देशात कोरोनाचे 7231 नवे रुग्ण, संसर्गाचा दर 2.05 टक्क्यांवर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -