घरट्रेंडिंगNASA Challenge: अंतराळात शौचालय बांधा, २६ लाख कमवा!

NASA Challenge: अंतराळात शौचालय बांधा, २६ लाख कमवा!

Subscribe

अंतराळवीरांना अंतराळ आणि चंद्रावर जाण्यासाठी शौचालय डिझाइन करण्याचे हे अनोखं आव्हान असणार आहे

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक आव्हान दिले आहे. जो हे अनोखं आव्हान पूर्ण करणार त्याला २६.०८ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. अंतराळवीरांना अंतराळ आणि चंद्रावर जाण्यासाठी शौचालय डिझाइन करण्याचे हे अनोखं आव्हान असणार आहे. या शौचालयचे जे तीन डिझाईन्स सर्वोत्तम असेल, त्यांच्यात या बक्षीसाचे दिले जाणार आहे.

अंतराळवीरांना अंतराळात किंवा चंद्रावर जाण्यासाठी अत्याधुनिक शौचालयाची आवश्यकता असणार आहे. हे शौचालय असे असावे की ते वजनाने हलके असेल आणि चांगल्या प्रकारे रिसायकलिंग देखील करू शकेल. जर कोणी नासाचे हे आव्हान पूर्ण केले तर तो कोट्यावधी रुपये कमवू शकतो, असे सांगण्यात आले आहे. नासाला त्याच्या अंतराळवीरांसाठी स्नानगृह, शौचालय या विषयासंबंधित समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे. १९७५ मध्ये अपोलो मिशनचा शेवट झाला तेव्हा अभियंत्यांनी मलमूत्र विसर्जनासाठी अवकाश प्रवासाला एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

ज्याचे डिझाईन सर्वोत्कृष्ट असेल त्याला १५ लाख रुपये, दुसर्‍याला ७.६० लाख रुपये आणि तिसऱ्याला ३.८० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. नासा आपल्या आर्टेमिस मून मोहिमेद्वारे २०२४ मध्ये प्रथमच एका महिलेस चंद्रावर पाठवणार आहे. अशा परिस्थितीत, युनिसेक्स टॉयलेटची आवश्यकता भासणार आहे.  नासाच्या या आव्हानात सहभागी होऊन डिझाइन पाठविण्यासाठी अंतिम मुदत १७ ऑगस्ट असून त्याचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शौचालय मायक्रोग्रॅविटी (स्पेस ग्रॅव्हिटी) आणि चंद्र गुरुत्व (चंद्राचे गुरुत्वाकर्षण शक्ती) मध्ये कार्य करण्यास सक्षम असावे, एवढीच एक अट आहे.

या शौचालयाची आवश्यक याकरता आहे, जेणेकरून अंतराळवीरांना आवकाशात तसेच चंद्रावर अधिक वेळ घालवता येईल. असा विश्वास आहे की, नासा चंद्रावर बेस कॅम्प बनवण्याची योजना आखत असून तेथे लोक बराच काळ राहू शकतील.

- Advertisement -

नासाने या आव्हानाला लूनर लू असे नाव दिले आहे. नासाने आपल्या निवेदनात म्हटले की, अवकाशात शौचालय आधीच तयार आहे. त्याचा वापरही केला जात आहे. आर्टेमिस मिशन अंतर्गत नासा चंद्र ते मंगळापर्यंत संशोधन करणार असून नासा यासाठी ह्युमन लँडिंग सिस्टम प्रोग्रामदेखील तयार करत आहे.


Vidoe : NASA ने केले १० वर्ष सूर्याचे निरिक्षण; बघा ‘कसा’ बदलला सूर्य!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -