Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मंगळावर आज नासाचे Perseverance Rover होणार लँड

मंगळावर आज नासाचे Perseverance Rover होणार लँड

इनसाइट सेटालाईट करणार Perseverance Roverचे स्वागत

Related Story

- Advertisement -

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपली मंगळ मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेतील नासाचे आणखीण एक अंतराळयान मंगळावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. आज म्हणजे १८ फेब्रुवारीला Perseverance Rover नावाचे हे यान मंगळावर उतरणार आहे. मंगळावर पोहचण्यासाठी Perseverance Rover ला अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. नासाने याआधी पाठवलेले ‘इनसाइट’ हे अंतरळयान Perseverance Rover ला सांभाळून घेण्यास मदत करेल. मंगळावर उतरण्याच्या आधीचे अर्धातासPerseverance Rover साठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण Perseverance Mars Rover हे ८० हजार किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करणार आहे. या ३० मिनिटात Perseverance Rover ला आपल्या गतीत स्थिरता आणावी लागणार आहे. नाहीतर हे रोवर मंगळावर जोरदार आदळू शकते. ही पहिली अडचण असणार असून दुसरी अडचण म्हणजे तेथील उष्ण वातावरण. मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करताना Perseverance Rover चे तब्बल १००० डिग्री सेल्सियस प्रमाणात घर्षण होणार आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात उष्णता निर्माण होणार असून या उष्णतेचा सामना Perseverance Rover ला करावा लागणार आहे. त्यानंतर हे रोवर मंगळावरील जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या ठिकाणी उतरणार आहे. जेजेरो क्रेटर ही जागा अधिक आव्हानात्मक खोल डोंगरदऱ्यांनी, घसरत्या माती आणि दगड्यांनी भरलेली जागा असून याठिकाणी समुद्र देखील आहे. त्यामुळे हे आव्हान पाहता Perseverance Rover चे लॅडिंग किती यशस्वी होईल याकडे जगभरातील वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.

याआधीही नासाने ‘मार्स इनसाइट’ हे यान मंगळावर पाठवले आहे. या यानाच्या मदतीने Perseverance Rover ला अडचणींचा सामना करताना मदत मिळणार आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये नासाने हे यान मंगळावर उतरले होते. ‘मार्स इनसाइट’ हे यान फक्त मंगळ ग्रहाच्या गर्भात आणि ग्रहावर होणाऱ्या भूकंपांच्या घटनांची माहिती देत असते. नोव्हेंबर २०१८ नंतर मंगळ ग्रहावर झालेल्या भूकंपाची माहिती हे यान नासाला पाठवत आहे. त्यामुळे Perseverance Rover देखील मंगळावर लाँड होईल तेव्हा मार्स ‘इनसाइट यान’ नासा आणि परसेंवर्न्सला भूकंपाची पूर्व सुचना पाठवणार आहे.
पृथ्वीवर येणाऱ्या भूकंपाच्या घटनेला आपण अर्थक्वेक म्हणतो. त्याचप्रमाणे मंगळावर होणाऱ्या भूकंपांच्या घटनांना आता मार्सक्वेक मार्सक्वेक (Marsquake) या म्हणतात. मार्स क्वेक हे नाव ‘मार्स इनसाइट’ या यानाच्या नावावरुन देण्यात आले आहे. २०१९ मध्ये मार्स इनसाइटने मंगळावरीही भूकंप होते ही घटना जगाला सांगितली होती. परंतु मंगळ ग्रहावरील भूकंप पृथ्वीवरील भूकंपापेक्षा रहस्यमय असतात. कारण पृथ्वीवरील भूकंपाच्या क्षमतेचे मापन आणि संशोधन करण्यासाठी हजारो केंद्र उभारली गेली आहेत. पण मंगळावरील भूकंपाचे संशोधन करण्यासाठी एकच केंद्र आहे. आणि यालाच ‘मार्स इनसाइट’ नावाने ओळखले जाते. त्यामुळे येथील भूंकपाच्या घटनांची अधिक माहिती जाणून घेताना अनेक अडचणी येतात. नुकताच या यानाने मंगळावर एक वर्ष पूर्ण केले. मंगळावरील एक दिवस हा पृथ्वीवरील दोन दिवसाप्रमाणे असतो. म्हणजेच मंगळावर ६८७ दिवसांचे एक वर्ष होते.

- Advertisement -

‘इनसाइट’ या ग्रहाने आजपर्यत अनेक भूकंपाच्या घटनांची माहिती संकलित केली आहे. परंतु या माहिततीतून भूकंप कुठे झाला, व त्याची तीव्रता किती होती ही स्पष्ट होऊ शकत नाही. परंतु परसेंवर्न्स मार्स रोवर लॅडिंगदरम्यान इनसाइट आपले काम करणार आहे. ज्यावेळी परसेंवर्न्स मार्स रोवर मंगळ ग्रहावर उतरेल त्यावेळी मार्स इनसाइट रोवरने सुरक्षित लॅडिंग केली की नाही याची माहिती नासाला पाठवेल. परसेंवर्न्स मार्सच्या लॅडिंग झाल्यानंतर मंगळ ग्रहाच्या जमिनीवर भगडाद पडले तर त्याची माहिती ३००० कि.मी असलेल्या इनसाइट मार्सला मिळणार आहे. मंगळावरील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नासा व जगातील वैज्ञानिकांसाठी ही मोहिम महत्त्वकांक्षी आहे. त्यामुळे नासाला NASA Perseverance Mars Rover ही मोहिम पूर्ण होईपर्यंत चिंता लागली आहे.


हेही वाचा- मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल

 

- Advertisement -