Nasaच्या शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागावर दिसले मोठे छिद्र ; पृथ्वीला धोका पोहचण्याची शक्यता

NASA scientists found large holes in the sun's surface; Possibility of endangering the earth
Nasaच्या शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागावर दिसले मोठे छिद्र ; पृथ्वीला धोका पोहचण्याची शक्यता

नासाच्या शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक माहिती दिली आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सूर्याच्या पृष्ठभागावर एक मोठे छिद्र दिसले आहे.या छिद्रातून चार्ज केलेल्या कणांचा सतत पाऊस पडतो. हे कण या आठवड्याच्या अखेरीस पृथ्वीच्या वातावरणाला धडकण्याची शक्यता आहे. नासाच्या सौर डायनॅमिक वेधशाळेने सूर्याच्या बाह्य वातावरणात एक मोठे कोरोनल छिद्र शोधून काढले आहे. स्पेसवेदरच्या अहवालानुसार, यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये काही किरकोळ भूचुंबकीय हालचाल होऊ शकते. ध्रुवीय प्रदेशात अरोरा प्रभाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे विद्युत् प्रवाह पृथ्वीकडे जात आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या आकाशात हिरव्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळू शकतो.

सौर वादळाचे ‘हे’ आहेत धोके…

सौर वादळांमुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण तापू शकते, ज्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होऊ शकतो. यामुळे GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईन्समध्ये करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे संरक्षणात्मक ढाल म्हणून काम करत असून,  ही सर्व आपत्ती पृथ्वीवर ओढवण्याची शक्यता कमी आहे. साधारणपणे, सूर्याभोवती चुंबकीय क्रिया असते, ज्यामुळे सौर वादळे होतात. त्या सौर वादळांमुळे सुर्यावर छिद्रे तयार आहेत, पण ती छिद्रे आपोआप मिटून जातात. मात्र, सूर्यावरील हे छिद्र सातत्याने वाढत असल्याने वैज्ञानिकांसाठी अडचणी निर्माण होत आहेत.


हे ही वाचा – Manike Mage hithe: ‘मनिके मागे हिते’ या गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?