घरCORONA UPDATENasal Spray Covid Vaccine: कॅनडाची सॅनोटाइज कंपनी भारतासह १२ देशांना करणार 'नेझल...

Nasal Spray Covid Vaccine: कॅनडाची सॅनोटाइज कंपनी भारतासह १२ देशांना करणार ‘नेझल स्प्रे’ लसींचा पुरवठा

Subscribe

कोरोनाविरोधात उपचार करण्यासाठी भारतात लवकरचं नेझल स्प्रे लस उपलब्ध होणार आहे. यासाठी नेझल स्प्रे लस तयार करणाऱ्या कॅनडातील सॅनोटाइज रिसर्च अँड डेवलपमेंट कॉर्पोरेशनसह भारतातील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने एक करार केला आहे. भारताशिवाय ही कॅनेडियन कंपनी सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका यासह आशियातील अनेक देशांना नेझल स्प्रे लसींचा पुरवठा करणार आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सल्दाननहा यांनी सांगितले की, या लसीमुळे आशियातील देशांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता दबाव कमी होईल. यासाठी आमची कंपनी आशियायी देशांमध्ये नेझल स्प्रे लसींच्या पुरवठा शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

कसा केला जातो नेझल स्प्रे लसीचा वापर ?

कॅनडाच्या वँकुवर येथील सॅनोटाईज या बायोटेक कंपनीने हे नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे (NONS) लस विकसित केली आहे. नेझल स्प्रे (NONS) लस स्वत:च्या नाकात स्प्रे केल्यास नाकातील व्हायरल इंफेक्शन लोड कमी करण्यास मदत होते. यामुळे, ना विषाणू वाढू शकतो आणि ना ही फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकते. कॅनडा आणि यूकेमध्ये या नेझल स्प्रे लसींच्या चाचण्या झाल्या आहेत. यात ७९ संक्रमित लोकांवर दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्समध्ये, नेझल स्प्रेने २४ तासांच्या आत ९५ टक्के आणि ७२ तासांच्या आत ९९ टक्के व्हायरलचा लोड कमी केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या यूके व्हेरियंटविरूद्ध ही लस प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

कॅनडातील दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स दरम्यान १०३ लोकांच्या नाकात ही नेझल स्प्रे लस स्प्रे करण्यात आली. यावेळी कोणीही व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आढळला नाही. दुसरीकडे UK फेज-2 NHS क्लिनिकल ट्रायल्समध्ये ७० लोकांचा समावेश होता. यातील सर्वच कोरोना पॉझिटिव्ह होते. या सर्व लोकांच्या नाकात नेझल स्प्रे लस स्प्रे करण्यात आली. यात संशोधानात सहभागी लोकांपेक्षा अन्य लोकांमध्ये १६ टक्के अधिक व्हायरल लोड होता. यापूर्वी कॅनडामध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ७००० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यात कोणत्याही रुग्णाला गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत.

- Advertisement -

भारतात होऊ शकतात फेज -3 च्या चाचण्या

इस्राईल आणि न्यूझीलंडने या स्प्रेला लसींच्या वापरासाठी मान्यता दिली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात इस्राईलमध्ये या नेझल स्प्रे लसींच्या उत्पादनास सुरु केले. यावर सॅनोटाइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक डॉ. गिली रेगेव म्हणाले की, कंपनी भारतात भागीदार शोधत असून आशा करतो की, ही नेझल स्प्रेला भारतात मेडिकल उपकरण म्हणून मंजूर मिळू शकते.

सॅनोटाइझ कंपनीला ४ ते ५ हजार लोकांवर फेज -3 च्या चाचण्या करायच्या आहेत. या फेज -3 चा काही भाग भारतातही होऊ शकतो. परंतु यासाठी ते निधी जमा करत आहेत. निधी प्राप्त होताच कंपनी पुढे भारतामध्ये चाचण्या घेण्यास सुरुवात करेल.


जग लवकरचं होईल मलेरिया मुक्त, लंडनच्या शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरु


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -