Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Nasal Vaccine : नेजल वॅक्सिन इतर वॅक्सिनपेक्षा का आहे वेगळी? जाणून घेऊ

Nasal Vaccine : नेजल वॅक्सिन इतर वॅक्सिनपेक्षा का आहे वेगळी? जाणून घेऊ

लहान मुलांसाठी बनू शकते 'गेम चेंजर' ?

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. यातच देशातील अनेक भागात लसीकरण मोहिम वाढवली आहे. यामुळे सर्वाधिक नागरिक लसीकरणातून स्वत:ला सुरक्षित करत आहेत. लसी उत्पादक कंपन्यांकडूनही कमीत कमी वेळात सर्वाधिक उत्पादन घेत ते देशभरात वितरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेजल वॅक्सिन स्प्रे संदर्भात भाष्य केले. नेजल स्प्रे वॅक्सिनवर रिसर्च सुरु असून जर हा रिसर्च यशस्वी झाला तर देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु राहण्यास मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. परंतु ही नेजल स्प्रे वॅक्सिन नेमकी आहे कशी? आणि ती इतर वॅक्सिनपेक्षा का वेगळी आहे? हे जाणून घेऊ या…

नेजल लस (वॅक्सिन) नेमकी आहे तरी कशी?

नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल वॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजे कोरोना विषाणूचा नाकावाटे शरीरात प्रवेश होण्याआधीच ही लस संसर्ग थांबवण्यासाठी प्रयत्न करते. गेल्यावर्षी वैज्ञानिकांनी या लसीवर संशोधन सुरु केले. या लसीचा एकचं डोस नाकेवाटे दिला जातो. या लसींचा पहिला प्रयोग उंदारांवर करण्यात आला आणि तो प्रयोग यशस्वीही झाला. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोना विषाणून नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकावाटे शरीरात प्रवेश करतो त्यानंतर तो शरीरातील इतर अवयवांना धोका पोहचवतो. परंतु या लसीमुळे नाकावाटे विषाणूचा शरीरास होणारा धोका रोखता येणार आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, भारतात नेजल वॅक्सिन (लस) तयार करण्यासाठी अभ्यास सुरु असून ही लस लहान मुलांसाठी ‘गेम चेंजर’ बनू शकते.

कोणती कंपनी करतेय नेजल स्प्रे लसीची निर्मिती?

- Advertisement -

कोवॅक्सीन लसीची निर्मिती करणाऱ्या हैदराबादस्थित भारत बायटेक कंपनीमध्ये सध्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या नेजल स्प्रे लसीची चाचणी सुरु आहे. BBV154 असं या नेजल लसीचे नाव आहे. ही लस सध्या प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे. सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) फेब्रुवारी महिन्यात भारत बायोटेकला या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती. कोरोना संक्रमण आणि कोरोना रोखण्यासाठी ही लस फायदेशीर असल्याचा सांगितले जात आहे. तसेच या वर्षाखेरीसपर्यंत भारत बायोटेकने नेजल स्प्रे लसीचे १०० दशलक्ष डोस तयार करण्याचे अपेक्षा व्यक्त केली आहे.

नेजल स्प्रे लसीचे फायदे ?

नेजल स्प्रे लस घेण्यासाठी न कोणतीही सुई टोचून घेण्याची गरज लागते न कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यांची. ही लस तयार करण्यासाठी विषाणूच्या कमकुवत घटकाचा वापर केला जातो. या लसीची महत्त्वाचा फायदा म्हणजे विषाणूला नाकावाटे शरारीत प्रवेश करण्याआधीचे रोखले जाते आणि त्यामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत नाही.

लहान मुलांसाठी बनू शकते ‘गेम चेंजर’ ?

- Advertisement -

सध्या देण्यात येणाऱ्या लसी सुई टोचून दिल्या जातात, मात्र नेजल स्प्रे लस ही पोलिओ लसीप्रमाणे तोंडावाटे देण्यात येणार आहे. किंवा नाकावाटे या लसीचे काही थेंब टाकले जाणार आहे. विषेशत: लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ही लस अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण लहान मुले सुई टोचून घेताना घाबरतात पण नेजल स्प्रे लसीमुळे सुई टोचून घेण्याचा प्रश्न उद्धवणार नाही. परंतु या लसींसाठी पोलिओच्या लसींप्रमाणेच थंड तापमान, काळजीपूर्वक हाताळणी या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

इतर लसींपेक्षा नेजल स्प्रे लस का आहे वेगळी ? 

सध्या देशात करोना लसीकरण मोहिमेत सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा वापर केला जात आहे. मात्र या दोन्ही लसी इंटरामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. परंतु नाकावाटे दिली जाणारी ही लस पूर्णपणे वेगळ्या स्वरुपाची असल्याचा दावा केला जात आहे. तसेच ही लस इतर लसींपेक्षा अधिक स्वस्त, असतील असं सांगितलं जात आहे. तसेच सध्या देण्यात येणाऱ्या लसींमध्ये दोन डोस घेणे अनिवार्य आहे. परंतु नेजल वॅक्सिनचा एक डोस घ्यावा लागणर आहे. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत.


IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: तब्बल १०४६६ रिक्त पदांसाठी IBPS जारी केले नोटिफेकेशन, जाणून घ्या डिटेल्स


 

- Advertisement -