Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश नासासाठी गौरवाचा क्षण! Perseverance Mars roverची मंगळावर यशस्वी लँडिंग

नासासाठी गौरवाचा क्षण! Perseverance Mars roverची मंगळावर यशस्वी लँडिंग

Perseverance Mars roverचं यशस्वी लँडिंग

Related Story

- Advertisement -

मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वाताचा अभ्यास करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) शोध मोहिम सुरु केली आहे. याच मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा नासाने पार केला. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या Perseverance Mars roverचं यशस्वी लँडिंग झाली आहे. अंतराळ संशोधनातील महत्त्वाचा टप्पापर्यंत पोहचल्याने नासासाठी हा अधिक गौरवाचा क्षण होता. जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील अती दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.त्यामुळे या रोव्हरचा पुढील प्रवास कसा असतो हे पाहणे अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने औत्सुक्याचे असणार आहे. अनेक अमेरिक नागरिकांनीही नासाच्या यशस्वी प्रयोगाचे सोशल मिडियावरुन कौतुक केले. तसेच ट्विटवर देखील ट्रेन्ड सुरु केला.

- Advertisement -

नासाच्या या रोव्हरने मंगळावर यशस्वी पाऊन ठेवताचा नासातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. हा क्षण प्रत्येक वैज्ञानिकांबरोबरच अमेरिकेसाठीही अधिक गौरवशाली राहिला. नासासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. ही नव्या युगाची सुरुवात आहे अशी भावना नासाच्या सायन्स असोसिएट अॅडमिनिस्टेटर थॉमस झुर्बकेन यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

तीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीप्रमाणे मंगळावरही मानवसृष्टी अस्तित्त्वात होती असे अंदाज बांधले जातात. त्याचाच अभ्यास करण्य़ासाठी Perseverance Mars rover मंगळावर पाठवले. हे रोव्हर मंगळावरील मातीचे सॅम्पल तसेच इतर अवशेष आणि मंगळावरीवर महत्त्वाचा घटनांना टीपत पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासाचे हे अभियान दोन वर्षे चालणार आहे.


हेही वाचा- मंगळावर आज नासाचे Perseverance Rover होणार लँड

 

- Advertisement -