घरदेश-विदेशजिथे जागा.. तिथे 'योगा' ! नताशाची खासियत

जिथे जागा.. तिथे ‘योगा’ ! नताशाची खासियत

Subscribe

'योग' करण्यासाठी 'ती' ना वेळ बघत ना स्थळ. कधी भर रस्त्यात तर कधी मेट्रो ट्रेनमध्ये, कधी रेल्वे ट्रॅकवर तर कधी थेट एअरपोर्टवर.. 'ती' कुठेही योग करते. चला डोकवूया 'या' भन्नाट योगप्रेमीच्या जगात...

योग दिनाच्या निमित्ताने जगभरात उत्साहाचं आणि फिटनेसचं वातावरण पाहायला मिळत आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी योग करतानाचे आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशीच एक ‘योग वेडी’ महिला आहे नताशा नोएल. मूळची झारखंडची असलेल्या नताशाचं खरं नाव राफिया नाज आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या नताशाला योग करण्याचं प्रचंड वेड आहे. पण मग नताशा आणि इतर योगप्रेमींमध्ये फरक तो काय? घेऊया जाणून…

‘ही’ आहे नताशाची खासियत

नताशाचे योग बाबतचे वेड इतके आहे की योग करण्यासाठी ती स्थळ-वेळ काहीच पाहत नाही. सहसा लोक आपल्या घरामध्ये, जीममध्ये, बागेत किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊन योग करतात. मात्र, नताशाला कोणत्याच ठिकाणाची मर्यादा नाही. अगदी फळ मार्केटपासून ते थेट एअरपोर्टपर्यंत ती कुठेही बिनधास्त योग करते. याच कारणामुळे नताशा आजवर नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. फळ किंवा भाजी मार्केटमध्ये, रेल्वे स्टेशनवर, एखाद्या अरुंद पूलावर किंवा छोट्य़ाश्या गल्लीबोळात.. नताशा कुठेही योग करु शकते. अशा अनेक भलत्या जागांवर जाऊन योग केल्याचे फोटो नताशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

- Advertisement -
सौजन्य – इन्स्टाग्राम

‘हे’ वेड अनेकदा ठरलंय अडचणीचं

नताशाने अनेकाद चालत्या मेट्रोमध्ये, ट्रेनमध्ये किंवा चक्क रेल्वे ट्रॅकवर जाऊन योग केला आहे. मात्र, अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी जाऊन योग करणं तिला अनेकदा अडचणीचं ठरलंय. बरेचदा लोकांनी तिच्याविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली आहे. काही वर्षांपूर्वी तर चक्क तिच्या मुंबईस्थित घरावर लोकांनी मोर्चा नेला होता. यावेळी तिच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. मात्र, ”अशा कुठल्याही घटनांमुळे डगमगून जाता, मी माझे योग प्रसाराचे काम सुरुच ठेवीन”, असं नताशा सांगते.

A post shared by Natasha noel (@natashanoel001) on

(एअरपोर्टवरच्या रनिंग बेल्टवर योग करताना नताशा / सौजन्य- इन्स्टाग्राम)

- Advertisement -

सोशल मीडियावर तिचे लाखो दिवाने

नताशा नोएल ही एक मान्यताप्राप्त योग शिक्षीका आहे. योग करण्यासोबतच ती लोकांना योग शिकवतेसुद्धा. नताशा इन्स्टाग्रामवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. अगदी कुठल्याही जागेवर जाऊन योग करतानाचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे इन्स्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिचे दिवाने आहेत.

‘योग’ हे आपलं पॅशन मानणारी आणि मिळेल त्या जागी जाऊन योग करणारी नताशा जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. पाहा, या ‘योग’वेडीचे काही भन्नाट फोटो…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -