घरदेश-विदेशदिल्लीत नितीश कुमार राहुल गांधींच्या भेटीला; मिशन २०२४ च्या तयारीवर चर्चा

दिल्लीत नितीश कुमार राहुल गांधींच्या भेटीला; मिशन २०२४ च्या तयारीवर चर्चा

Subscribe

नितीश कुमार यांनी बुधवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष अगदी दंड थोपाटून तयारीला लागले आहेत. याशिवाय आगामी निवडणूकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.

या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले, “विरोधकांना एकत्र आणण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. विरोधकांकडे देशासाठी असलेली दृष्टी आम्ही विकसित करू. जे काही विरोधी पक्ष आमच्यासोबत येतील, आम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार आहोत…एकत्र उभे राहून देशावर होत असलेल्या अतिक्रमणाचा सामना करू.”

- Advertisement -

सीएम नितीश कुमार म्हणाले की, “आम्ही फक्त बोललो आहोत. आम्ही बराच वेळ चर्चा केली. देशभरातील अधिकाधिक पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यापुढील काळात एकत्र काम करण्याचा निर्धार केला आहे.”

हे ही वाचा: ईडीकडून क्लिन चिट मिळालेली नाही, अजूनही चौकशी चालू – अजित पवार

- Advertisement -

विशेष म्हणजे खर्गे यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी समविचारी पक्षांमध्ये ऐक्यासाठी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. खर्गे यांनी नुकतंच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. येत्या काही दिवसांत खर्गे हे इतर विरोधी नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: “…तर हे चुकीचं आहे”; शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नितीश कुमार मंगळवारी दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी राजद प्रमुख लालू यादव यांची भेट घेतली. नितीश यांनी त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून भारतात परतल्यानंतर नितीश कुमार यांच्याशी त्यांची पहिली भेट होती. यावेळी त्यांनी लालूंची नात कात्यायनी हिला जवळ घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -