Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Covid 19: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पॉझिटिव्ह; रूग्णालयात दाखल

Covid 19: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पॉझिटिव्ह; रूग्णालयात दाखल

Related Story

- Advertisement -

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना मंगळवारी ३० मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. मात्र कोरोनावरील योग्य उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली. तर उमर अब्दुल्ला यांनी वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी ओमर अब्दुल्ला यांनी असे ट्विट केले की, ‘माझे वडील फारूक अब्दुल्ला यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उत्तम उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले गेले आहे. या संकटाच्या वेळी ज्यांनी संदेश पाठविला व पाठिंबा दर्शविला त्या सर्वांचे आमचे कुटुंब आभारी आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह

- Advertisement -

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारण २८ दिवसानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना मंगळवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. ही माहिती देखील फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली होती. यासह, त्यांनी गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते.

२ मार्च रोजी घेतली कोरोना लस

फारुख अब्दुल्ला यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने इतर कोणत्याही सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले नाही. फारूक अब्दुल्ला यांनी २ मार्च रोजी शेर-ए-काश्मीर इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगर येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

- Advertisement -