घरताज्या घडामोडीNational Education Day 2021 : ११ नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस का साजरा...

National Education Day 2021 : ११ नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस का साजरा करतात? जाणून घ्या

Subscribe

हा दिवस विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास असतो.

दरवर्षी ११ नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी देशाचे पहिले केंद्रिय शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिन असतो.याशिवाय मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणन साजरा केला जातो.हा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला. हा दिवस विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास असतो. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती असलेली आदरभावना,प्रेम व्यक्त करतात. याशिवाय अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध खेळ आणि कार्यक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ या कालावधीत देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकीर्दीत १९५१ मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन झाली.तसेच, १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचीही स्थापना झाली.

- Advertisement -

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला. मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधार्‍यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले हे जगाने पाहिले. मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. २२ फेब्रुवारी १९५७ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले.

मग ५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करतात ?

शिक्षक नेहमीच मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात आणि समाजातील एक चांगला नागरिक बनवतात. शिक्षक हा आपल्या जीवनाचा पाया आहे. असे म्हणतात की कोणत्याही मुलासाठी त्याचे पालक प्रथम स्थानावर असतात आणि नंतर शिक्षक दुसऱ्या स्थानावर असतात. त्यामुळे शिक्षकांविषयी आदरभावना व्यक्त करण्यासाठी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा केला जातो.

- Advertisement -

हे ही वाचा – Chennai Rain : पावसाचा कहर ! चेन्नईला हवामान विभागाकडून Red Alert


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -