Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE National Emergency : देशात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती, आज सर्वोच्च न्यायालयात सुमोटो याचिकेवर...

National Emergency : देशात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती, आज सर्वोच्च न्यायालयात सुमोटो याचिकेवर सुनावणी

आज दुपारी १२:१५ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची रुग्णसंख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखीच चिंताजनक होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी एक सुमोटे याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारने एक राष्ट्रीय योजना तयार करावी असे निर्देशही देण्यात आलेत. कोरोना व्यवस्थापनेसाठी सर्वोच्च न्यायलयाने प्रमुख चार मुद्द्यांची उत्तरेही मागितली आहेत. यासंदर्भात आज दुपारी १२:१५ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशात सध्या सुरु असलेला ऑक्सिजन, लसीकरणाचा तुटवडा, औषधे, देशात पुन्हा लॉकडाऊन लावावा का असे प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे देशात ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या चिंताजनक परिस्थितीचा विचार करुन सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी सुमोटो याचिका दाखल केली. देशातील सर्व रुग्णालयात ऑक्सिजना व्यवस्थित पुरवठा, औषधे आणि बेड्स व लसीकरण करण्याच्या पद्धतीसाठी एक नवे धोरण तयार करावे असे निर्देश केंद्र सरकारला दिले.

- Advertisement -

महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याने मृत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालाने पुढाकार घेऊन सुमोटो याचिका दाखल केली. केंद्र सरकारने देशाच्या चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन एक राष्ट्रीय धोरण तयार करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.


हेही वाचा – कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ

- Advertisement -

 

- Advertisement -