देशाची राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या 18 व्या G-20 शिखर परिषदेत जगभरातील नेते सहभागी होत आहेत. भारतात होणाऱ्या या जागतिक परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे या G-20 परिषदेशी संबंधित बातम्यांना देश आणि विदेशातील मीडियामध्ये महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. मात्र असे असले तरी देश आणि विदेशी प्रसारमाध्यमांमध्ये जी-20 परिषदेबाबत काय लिहण्यात आले आहे हे जाणून घेऊयात… (national g20 summit 2023 delhi from nytimes to bbc read what world media is saying on g20 usa uk china russia)
‘शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीत झालेल्या G20 परिषदेत रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा किंवा त्याच्या क्रूर युद्धाचा निषेध करण्यात आला नाही, तर युक्रेनच्या लोकांच्या ‘दुःखाबद्दल’ शोक व्यक्त करण्यात आला’, असे अमेरिकन वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार केटी रॉजर्स यांनी आपल्या लेखात लिहिले आहे. ‘हे गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या शिखर परिषदेच्या विपरीत होते, जेव्हा नेत्यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला आणि मॉस्कोला आपले सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले’, असेही वृत्तपत्रात छापण्यात आले.
वॉशिंग्टन पोस्ट या दुसर्या अमेरिकन वृत्तपत्राने आपल्या लेखात लिहिले आहे की “Biden ने G-20 मध्ये भारत, युरोपला जोडणारा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर जाहीर केला’. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांनी शनिवारी दुपारी येथे एक नवीन रेल्वे आणि शिपिंग कॉरिडॉर योजना (इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर) जाहीर केली, जी मध्यपूर्वेद्वारे भारत आणि युरोपला जोडेल”. ‘या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाचा उद्देश अस्थिर प्रदेशाला जोडणे आणि चीनच्या बीआरआयचा मुकाबला करणे हा आहे’, असेही या वृत्तपत्रात लिहिण्यात आले आहे.
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने ‘प्रमुख शक्तींमधील वाढत्या मतभेदांदरम्यान शिखर परिषद आयोजित केल्यामुळे पंतप्रधान ली यांनी G20 ऐक्य आणि सहकार्यासाठी आवाहन केले’, या नावाने प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात लिहिले की रशिया-युक्रेन संघर्ष, जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती, अन्न संकट आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवर प्रमुख शक्तींमधील वाढत्या मतभेदांदरम्यान जगातील 20 सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थांचे नेते आणि प्रतिनिधी भारतातील नवी दिल्ली येथे एकत्र आले आहेत. G20 चे स्थायी सदस्य म्हणून आफ्रिकन युनियन (AU) चा स्वागतार्ह समावेश हे पहिले उत्साहवर्धक लक्षण आहे जे प्रमुख शक्ती अर्थव्यवस्थांमधील एकमत दर्शवते. परंतु एकजुटीचा अभाव आणि संयुक्त घोषणेपर्यंत पोहोचण्यात अडचण याविषयी चिंता कायम आहे.
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी 20 राष्ट्रांच्या गटाला एकता आणि सहकार्याचे पालन करण्याचे आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्यापक आर्थिक धोरणांचे समन्वय मजबूत करण्याचे आवाहन केले, असे वृत्तपत्राने लिहिले आहे. तसेच, अमेरिकेवर निशाणा साधत वृत्तपत्राने लिहिले की, “अमेरिका या व्यासपीठाचा वापर करून बहुपक्षीय व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा आणि महान शक्ती स्पर्धेची आपली रणनीती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.”
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसीनेही अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाईम्स प्रमाणेच कमी-अधिक प्रमाणात असेच म्हटले आहे. बीबीसीने आपल्या लेखात लिहिले की, ‘G20 ने युक्रेनमधील युद्धाबद्दल खेद व्यक्त केला पण रशियाला दोष देण्याचे टाळले’.
भारतातील G20 शिखर परिषदेने संयुक्त घोषणेसाठी सहमती दर्शवली आहे, ज्यामध्ये युक्रेनमधील युद्धावरील निवेदनाचाही समावेश आहे. दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी, G20 नेत्यांनी प्रादेशिक फायद्यासाठी बळाच्या वापराचा निषेध केला, परंतु रशियावर थेट टीका केली नाही. युक्रेन सरकारने सांगितले की ‘अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही’. दिल्लीतील शिखर परिषदेत हवामान बदल आणि विकसनशील देशांच्या कर्जाचा बोजा यासह अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असे बीबीसी अखे यांनी लिहिले.
हेही वाचा – G-20 : दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक; शिखर परिषदेतील सूर